भागवत सोनवणे,
माहिती तंत्रज्ञान विषयातले जाणकार
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालावर आधारित एक लेख ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने अलिकडेच प्रकाशित केला. दोन ते चार वर्षांच्या मुलांनी दिवसातून फार तर एक तास फोन वापरणे योग्य असल्याचे संशोधनात आढळले आहे. चार वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनी दररोज दोन तास फोन वापरणे योग्य आहे. यापेक्षा जास्त स्क्रीन समोर राहिल्याने डोळ्यांसोबतच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो, असा निष्कर्ष आहे. संशोधनात सहभागी झालेल्या युवकांकडून 47 घटकांवर आधारित माहिती संकलित करण्यात आली. सहभागी लोकांकडून गोळा केलेली माहिती मूल्यांकन वापरून संकलित केली जाते. त्यात लक्षणे आणि मानसिक क्षमतांची विस्तृत श्रेणी समाविष्ट आहे आणि एकत्रित केलेल्या एकूण गुणांचाही समावेश आहे, त्याला ‘मानसिक आरोग्य निर्देशांक’असेही म्हटले जाते. मुला-मुलींना वयाच्या कोणत्या टप्प्यावर स्वतःचा स्मार्टफोन मिळाला, या माहितीशी तुलना केली. तेव्हा लक्षात आले की 18 ते 24 या वयोगटातल्या अगदी कमी वयात स्वतःचा स्मार्टफोन असणार्या मुलांचे मानसिक आरोग्य सुदृढ नाही. अठराव्या वर्षी स्मार्टफोन वापरायला सुरुवात करणार्यांमध्ये हे प्रमाण घसरून 36 टक्क्यांवर आले. वयाच्या सहाव्या वर्षी स्मार्टफोन वापरायला सुरुवात करणार्या मुलींमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या जडण्याचे प्रमाण 74 टक्के असल्याचे आढळले तर 18 व्या वर्षी स्मार्टफोन वापरणार्या मुलींमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांचे प्रमाण 46 टक्के असल्याचे आढळले.
मुलांच्या हातात स्मार्टफोन जेवढ्या उशिरा पडला, तेवढा त्यांच्यातील आत्मविश्वास वाढलाआयुष्यात उशिरा स्मार्टफोन वापरायला सुरुवात करणार्या मुलींच्या स्वभावातील मूड, दृष्टिकोन, अनुकूलता आणि लवचिकता अधिक असल्याचे लक्षात आले. भारतात दहा ते 14 वयोगटातील 83 टक्के मुलांच्या हातात स्मार्टफोन आहे. तंत्रज्ञानाच्या होत असलेल्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. भारतात 15 ते 25 या वयोगटातील मुलांची संख्या 20 कोटी एवढी आहे, त्या अनुषंगाने या संशोधनातील निष्कर्ष शाळा, पालक आणि इतरांसाठी दिशादर्शक ठरतील. सलग दोन ते तीन तासांपेक्षा जास्त काळ मोबाइलचा वापर केल्याने मुलांच्या एकाग्रतेवर परिणाम हेात आहे. वागण्यात बदल, चिडचिडेपणा, डोळ्यांचे आजार वाढत आहेत. ‘सोशल मीडिया’च्या वापरामुळे 20 ते 30 टक्के मुलांमध्ये मानसिक आजार जडत आहेत. केस स्टडीजनुसार पाच वर्षांपासून वयोवृद्धांपर्यत मानसिक आजार वाढल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यात मुलांचे प्रमाण तब्बल 20 ते 30 टक्क्यांपर्यंत आहे. विशेषत: झोप न लागणे, चिडचिडेपणा, चिंता, नैराश्य, इतरांबद्दल सहानुभूती न राहणे, निर्णयक्षमता कमी होणे, इतरांवरील प्रेम कमी होणे, काम विसरणे, स्मृतिभ्रंश, राग अशा प्रकारच्या समस्या उद्भवत आहेत.