Monday, November 25, 2024
Homeभविष्यवेधयोग्य जागेवर ठेवा कचरा पेटी

योग्य जागेवर ठेवा कचरा पेटी

वास्तुशास्त्रांमध्ये दिशेचे फार महत्त्व आहे. याचे पालन आम्ही रोजच्या जीवनात करतच असतो. अमाच्या जीवनात कुठलेही संकट येऊ नयेे यासाठी आम्ही आमच्या घरातील वस्तुंना योग्य जागेवर ठेवतो. अशात घरातील कचरापेटी ठेवण्याची ही योग्य जागा असायला पाहिजे. तर जाणून घेऊ कचरापेटी ठेवण्यासाठी कोणती दिशा शुभ असते आणि कोणती अशुभ असते.

* घरामध्ये सुख शांती कायम राहावी यासाठी घरामध्ये कोणते सामान कोणत्या जागेवर ठेवायला पाहिजे हे माहीत असणे फारच गरजेचे आहे. घरात कचरापेटी ठेवण्याची योग्य जागा असायला पाहिजे. बर्‍याच वेळा चुकीच्या जागेवर कचरा पेटी ठेवल्याने त्याचा चुकीचा प्रभाव पडतो.

- Advertisement -

*वास्तूनुसार घरामध्ये उत्तर दिशेत कचरा पेटी ठेवू नये. यामुळे घरात राहणार्‍या लोकांना नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून जर डस्टबिन तिथे ठेवले असेल तर लगेचच तेथून दुसरीकडे ठेवा.

* उत्तर दिशेला लक्ष्मीची दिशा म्हणतो. अशा जागेवर कचरा पेटी ठेवल्याने अडचणी येतात आणि धनहानी होऊ लागते. घरात लक्ष्मीचा वास राहत नाही.

* जर तुम्ही एखाद्या नोकरीच्या शोधात असाल आणि सारखे सारखे प्रयत्न केले तरी नोकरी मिळत नसेल तर एकदा आपल्या घरातील कचरा पेटीची जागा बदलून बघा, नक्कीच यश मिळेल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या