Tuesday, September 29, 2026
Homeनगरकेलवडच्या आदिवासी तरुणाची कर्नाटक सीमेवर क्रूर हत्या; नातेवाईकांचा रस्ता रोको

केलवडच्या आदिवासी तरुणाची कर्नाटक सीमेवर क्रूर हत्या; नातेवाईकांचा रस्ता रोको

राहाता (तालुका प्रतिनिधी)

केलवड येथील गरीब आदिवासी समाजातील तरुणाची कर्नाटकच्या बॉण्ड्रीवर अत्याचार करून क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अक्षय दशरथ रजपूत असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी सावळीविहीर-निर्मळ-पिंपरी बायपास रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले. यावेळी प्रशासनाविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त करण्यात आला.

- Advertisement -

स्थानिक नागरिक व नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा शेजारीच राहणाऱ्या प्रकाश विघे यांच्या वाहनावर वाहनावर मदतनीस (क्लिनर) म्हणून गेला होता. त्याला फसवून व गोड बोलून कर्नाटकात नेण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर कर्नाटकच्या सीमेवर अक्षयला अमानुष मारहाण करण्यात आली. सुमारे दोन किलोमीटर त्याला चालवत अथवा फरफटत नेऊन त्याच्यावर धारदार चाकूने प्राणघातक वार करण्यात आल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या क्रूर हल्ल्यात अक्षयचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

मृत अक्षयच्या पश्चात पत्नी, तीन लहान मुले तसेच आजारी आई-वडील असा परिवार आहे. कुटुंबाचा एकमेव कमावता आधार गेल्याने या गरीब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. “एखाद्या प्राण्यालाही कोणी इतक्या क्रूरपणे मारणार नाही, तितक्या अमानुषपणे अक्षयची हत्या करण्यात आली आहे,” असा आरोप नातेवाईकांनी केला.

या घटनेतील दोषीला फाशीची शिक्षा द्यावी, आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी करत नातेवाईकांनी रस्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. दरम्यान, तहसीलदार तसेच राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक सरोदे आणि शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे यांच्या मध्यस्थीने नातेवाईकांना योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर नातेवाईकांनी रस्ता रोको आंदोलन मागे घेत प्रशासनाला सहकार्य केले.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक वाढली; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 5000 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची (Onion) मंगळवारी राहाता...