नवी दिल्ली | New Delhi
केरळच्या (Kearla) वायनाडमध्ये (Wayanad) पावसाने अक्षरक्षा धुमाकूळ घातला आहे. या पावसादरम्यान आज मंगळवारी पहाटे भूस्खलन (Landslide) झाले असून या भूस्खलनाच्या घटनेत १०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. तसेच सध्या याठिकाणी मोठ्या प्रमाणावर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून सकाळी या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर आता या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढल्याची माहिती समोर आली आहे.
हे देखील वाचा : Kerala Landslide News : केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन; ११ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू (Death) झाला असून यात काही मुलांचाही समावेश आहे. तसेच अजूनही मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय या भीषण भूस्खलनात जवळपास २०० घरांचे (House) नुकसान झाल्याचे समजते. तसेच, मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) रस्ते आणि पूलही खचले आहेत. तर एका नदीत मृतदेह (Dead Body) वाहून जातानाही दिसून आल्याची घटना घडली आहे.
हे देखील वाचा : हावडा-मुंबई एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरल्याने भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, २० हून अधिक जखमी
पंतप्रधान मोदींकडून मदतीची घोषणा
केरळमधील या भूस्खलनात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराचे हेलिकॉप्टर वायनाडला रवाना झाले आहेत. या दूर्घटनेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदतही जाहीर केली आहे. याशिवाय जखमींनाही २० हजार रुपये जाहीर केले आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा