दिल्ली | Delhi
केरळमधील एर्नाकुलम येथे आज सकाळी एका ख्रिश्चन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात एक जण ठार झाला आहे. तर अनेक नागरिक जखमी झाले आहेत.
केरळमध्ये झालेल्या साखळी स्फोटामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या पार्श्वभूीवर हाय अलर्ट देण्यात आला आहे. राजधानी दिल्लीसह मुंबई आणि पुण्यात देखील यंत्रणा अलर्ट मोड वार ठेवण्यात आल्या असून काही परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबई आणि पुण्यात पोलीस सतर्क झाले आहेत. शहरात सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करत आहेत.सर्व महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांवर नजर ठेवण्यात आली आहे.
ज्यूंच्या धार्मिक स्थळांवर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोचीमध्ये कोचीमध्ये झालेल्या स्फोटानंतर नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) आणि काउंटर टेरर एटीसीची टीम घटनास्थळी रवाना झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला स्फोट सकाळी 9.30 च्या सुमारास झाला. त्यानंतर एकापाठोपाठ तीन स्फोटांनी संपूर्ण कन्व्हेन्शन सेंटर हादरले. प्राथमिक तपासात स्फोटांसाठी ‘इन्सेंडरी डिव्हाईस’ आणि ‘इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस’ म्हणजेच आईडीचा (IED) वापर करण्यात आला होता. हे स्फोटके टिफिन बॉक्समध्ये लपवून ठेवली होती.
एक दिवस आधी केरळमध्ये हमासच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली होती. त्यामुळे केंद्र सरकारने या स्फोटाला गांभीर्याने घेतलं आहे. जमात-ए-इस्लामीच्या सहयोगी संघटनेने मलप्पुरममध्ये हमासच्या समर्थनार्थ रॅली काढली होती. एक दिवस आधी कॅथोलिक चर्चने हमासचा निषेध केला होता. केरळमधील रॅलीत हमासच्या माजी प्रमुखाचे ज्या पद्धतीने भाषण केले जाते आणि त्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जातात, ते योग्य नाही. दहशतवाद्यांचा गौरव करू नये, असे चर्चच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यानंतर आता चर्चवरच प्रार्थना सभेदरम्यान हल्ला झाला आहे.