Monday, September 14, 2026
HomeनगरAhilyanagar : गावनिहाय, तालुकानिहाय रॉकेलची मागणी नोंदवा

Ahilyanagar : गावनिहाय, तालुकानिहाय रॉकेलची मागणी नोंदवा

राज्य पातळीवरून सूचना || एका लिटरसाठी मोजावे लागणार 60 ते 70 रुपये

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

भविष्यात गॅस सिलिंडर टंचाई निर्माण होऊ, यासाठी शासनाने अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना मागणीनुसार पाच लिटरपर्यंत रॉकेल देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सोमवारी राज्य पातळीवरून रॉकेलच्या नियोजनासाठी झालेल्या ऑनलाईन बैठकीत जिल्हा पातळीवरून तालुकानिहाय व गावनिहाय रॉकेलची मागणी नोेंदवण्याच्या सुचना पुरवठा खात्याला देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

आखाती देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका सामान्य नागरिकांच्या चुलीपर्यंत बसत आहे. मागील काही दिवसांपासून एलपीजी सिलिंडर टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांना सिलिंडर बुकिंगसाठी 45 दिवसांची तर शहरातील कुटुंबांना 25 दिवसांची मर्यादा घालून दिली आहे. शासनाने अशा स्थितीत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांची परवड होऊ नये, म्हणून रॉकेल वितरणाचा निर्णय घेतला आहे. याबाबत शासनाने जिल्हा पुरवठा विभागाकडे जिल्ह्यातील रॉकेल वितरण आणि पुरवठा करण्याबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. पुरवठा विभागाने सादर केलेल्या अहवाल 45 पैकी अवघ्या8 ते 10 घाऊक विक्रेत्यांनी रॉकेल पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे.

जिल्ह्यातील रॉकेल वाटपाबाबत सोमवारी जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने राज्य पातळीवर ऑनलाईन बैठकीत माहिती सादर केली. यात जिल्ह्यातील जुन्या घाऊक रॉकेल विक्रेत्यांपैकी काहींनी रॉकेलचे वाटप करण्यास सहमती दर्शवली आहे. असे असतांना राज्य पातळीवरून जिल्ह्यातील तालुकानिहाय आणि गावनिहाय रॉकेलची मागणी करण्यात यावी, अशा सुचना करण्यात आल्या. दरम्यान, नगर जिल्ह्याला राज्य पातळीवरून एक लाख ते 80 हजार लिटर रॉकेल मिळणार आहे. मिळणारे रॉकेल अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब अशा सात लाख लाभार्थ्यांमध्ये वाटप करण्यात येणार आहे. साधारणपणे 60 ते 70 रुपये प्रती लिटर रॉकेलला दर राहणार आहे.

नगरच्या बाजारपेठेत स्टोव्ह उपलब्ध नाहीत
नगरच्या बाजारपेठ स्टोव्ह आणि रॉकेलवर स्वयंपाकासाठी आवश्यक असणारी उपकरणे शिल्लकच नाहीत. विशेष करून पाथर्डी, नेेवासा, कर्जत, अकोले, श्रीरामपूर, श्रीगोंदा आणि कोपरगाव या ठिकाणी स्टोव्ह उपलब्ध होण्याची शक्यता कमी असल्याचे स्थानिक प्रशासनाच्यावतीने पुरवठा विभागाला कळवण्यात आलेले आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातून 3147 क्युसेकने विसर्ग सुरू

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा पाणलोटात शनिवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाल्याने काल सायंकाळी 11039 क्षमतेच्या धरणातून 3147 क्युसेकने विसर्ग...