Friday, November 22, 2024
HomeमनोरंजनMaratha Reservation : मराठा समाजाच्या आंदोलनावरील पोस्टनंतर केतकी चितळे ट्रोल

Maratha Reservation : मराठा समाजाच्या आंदोलनावरील पोस्टनंतर केतकी चितळे ट्रोल

मुंबई | Mumbai

राज्यात मराठा आरक्षणाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विविध नेत्यांचे घर, बंगले व पक्षांचे कार्यालये तसेच हॉटेलच्या तोडफोडीनंतर मराठा आदोलकांनी शेकडो बस फोडल्या आहेत. बीड, सोलापूर, नांदेडसह महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आंदोलकांनी एसटी बसवर दगडफेक करत काचा फोडल्या आहेत. या कृत्यावर आता अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketaki Chitale) हिने लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र केतकीच्या प्रतिक्रियेमुळे ती प्रचंड ट्रोल होतेय.

- Advertisement -

केतकी चितळेने एसटी बसच्या काचा फोडनाताचा एक फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, ‘एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा? इंडियाला Uniform Civil Code (UCC) हवा असेल. पण भारताला Uniform Civil Law तसेच Uniform Criminal Law ची गरज आहे. सरकारकडे मागणी करा, सामान्य माणसाला त्रास देऊन काय होणार? आणि एसटी विभाग किंवा बस चालक कसे देणार आरक्षण? चुकून तो दगड चालकाला लागला असता तर?’ असे प्रश्न अभिनेत्रीने उपस्थित केले आहेत. या प्रश्नावरुन तिला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केले आहे.

अनेकांनी केतकीला वातावरण खराब आहे. अशा पोस्ट करू नको, शांत राहा असा सुद्धा सल्ला दिलाय. पण तुम्ही माझ्या पोस्टकडे दुर्लक्ष करू शकता असा सल्लाच तिने नेटकऱ्यांना दिलाय. अशा प्रकारे ट्रोल होण्याची ही केतकीची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी हिंदीत बोलण्यावरून, युनिफॉर्म सिव्हील कोड सारख्या पोस्टवरून वाद झाला होता. शरद पवार यांच्यावर अर्वाच्य भाषेतली कविता शेअर केल्यामुळे केतकीला तुरुंगातही जावं लागलं होतं. पुढे तुरुंगातून ती बाहेरही आली. पण केतकी अनेक विषयांवर आपली मतं मांडत असते. त्यामुळे अनेक वाद निर्माण होतात.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या