Wednesday, March 26, 2025
Homeमनोरंजनसलाम रॉकी भाई! KGF 2 चा टीझर रिलीज

सलाम रॉकी भाई! KGF 2 चा टीझर रिलीज

मुंबई | Mumbai

बहुप्रतिक्षित केजीएफ २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘केजीएफ चॅप्टर २’ (KGF Chapter 2 Teaser) चा टीझर रिलीज झाला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे

- Advertisement -

दिलेल्या वेळेच्या एक दिवस अगोदरच हा टीझर रिलीज झाला आहे. सुपरस्टार यशच्या वाढदिवसादिवशी सिनेमाचा टीझर लाँच करणार होते. मात्र त्यांनी एक दिवस अगोदर केलं आहे. या टीझरची चाहते मनापासून वाट पाहत आहेत. या टीझरला होमबेल फिल्म्सने यूट्यूबवर रिलीज केलं आहे. टीझर रिलाज होताच सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगली आहे.

टीझरच्या सुरुवातीला रॉकीची आई आणि त्याचं बालपण दाखवण्यात आलं आहे. त्याच्या आईने त्याला लहानाचं मोठं कसं केलं आणि कोणत्या परिस्थितीत तो मोठा झाला. तसंच त्याने दिलेलं वचन आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे. या टीझरमध्ये अभिनेत्री रविना टंडन झळकली असून या चित्रपटात ती एका राजकीय व्यक्तीच्या भूमिकेत झळकणार असल्याचं दिसून येत आहे. तसंच संजय दत्तचीदेखील झलक या टीझरमध्ये पाहायला मिळाली. तसंच सुपरस्टार यशदेखील त्याच्या दमदार स्टाइलमध्ये झळकला आहे.

दरम्यान, ‘केजीएफ चॅप्टर – २’ हा चित्रपट ज्या ठिकाणी संपला, तेथूनच पुढे केजीएफ चॅप्टर २ ची कथा सुरु होत आहे. या सिक्वलमध्ये संजय दत्त आणि रविना टंडन हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट तेलुगू, हिंदी, कन्नड आणि तामिळ या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 99 ग्रामपंचायतींची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका...