Monday, March 31, 2025
HomeमनोरंजनKGF Chapter 2 चे पोस्टर लाँच, 'या' दिवशी होणार टीझर रिलीज

KGF Chapter 2 चे पोस्टर लाँच, ‘या’ दिवशी होणार टीझर रिलीज

मुंबई । Mumbai

यश आणि संजय दत्त यांच्या आगामी ‘केजीएफ: चॅप्टर 2’ या चित्रपटाचे नुकतेच चित्रीकरण पूर्ण झाले आहे. या चित्रपटासाठी प्रत्येकजण खूपच उत्सुक आहे. पहिल्यांदाच कन्नड चित्रपटात संजय दत्त दिसणार आहे. चित्रपटाचा क्लायमॅक्स शूट झाल्यानंतर सेटवरची अनेक छायाचित्रेही समोर आली होती.

- Advertisement -

निर्मात्यांनी आता चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. ज्यामध्ये अभिनेता यशचा डेडली लूक समोर आला आहे. या पोस्टरद्वारे पहिल्या टीझरची माहिती समोर आली आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्शने ट्विट करून चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. केजीएफ: चॅप्टर 2 या चित्रपटाचा टीझर 8 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10.18 मिनिटांनी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.

8 जानेवारीला रिलीज करण्याचं खास कारण म्हणजे या दिवशी अभिनेता यशचा वाढदिवसही आहे. या दिवशी अभिनेता यश ‘केजीएफ चॅप्टर 2’ या सिनेमाचा टीझर रिलीज करून त्यांच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज देणार आहे. ‘केजीएफ चॅप्टर 2’ बद्दल सांगायचं झालं तर यामध्ये संजय दत्त, रवीना टंडन, यश मुख्य भूमिकेत असून संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

देवगाव शिवारात अवैध वाळु वाहतुकीवर कारवाई

0
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa नेवासा पोलिसांनी (Newasa Police) देवगाव शिवारामध्ये एका डंपरमधून होत असलेल्या अवैध वाळु वाहतुकीवर कारवाई केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे....