Friday, November 15, 2024
Homeराजकीयखडसेंनी रिट्वीट केलेले 'ते' ट्विट केले डिलीट; विविध चर्चांना उधाण

खडसेंनी रिट्वीट केलेले ‘ते’ ट्विट केले डिलीट; विविध चर्चांना उधाण

मुंबई | Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर टीका करणारं एक ट्वीट जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. तेच ट्वीट एकनाथ खडसे यांनी रिट्वीट केले होते. मात्र काही वेळातच ते ट्विट त्यांनी डीलिट केले आहे. एकनाथ खडसे यांनी हे ट्विट अवघ्या काही वेळातच डिलीट का केले? याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

हे ट्विट केले होते रिट्वीट..

जळगावातील खडसेंच्या पोस्टरमधून कमळ गायब

दरम्यान एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यतेनंतर कार्यकर्त्यांनी जळगावात पोस्टर लावले. कार्यकर्त्यांनी भाजपचं चिन्ह हटवत खडसे यांचे बॅनर आपल्या वाहनावर आणि रस्त्याच्या कडेला लावले आहेत. “भाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण,” “भाऊ आम्ही सदैव आपल्यासोबत” असं बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे समर्थकांची बॅनरबाजी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.

नाथाभाऊंची नाराजी दूर होऊन ते पुन्हा आमचे नेतृत्व करतील

नाथाभाऊंचे अखेर ठरले?

गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू झालेल्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे राष्ट्रवादी प्रवेशाचे अखेर निश्‍चित झाले असून, गुरुवारी शरद पवारांच्या उपस्थितीत माजी मंत्री एकनाथराव खडसे त्यांच्या कन्या तथा जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ऍड. रोहिणी खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करुन भाजपाला कायमचा रामराम ठोकणार आहे.

त्यादृष्टीने खडसे समर्थकांकडून जोरदार हालचालींना जोर आला असून, खडसे मोजक्या कार्यकर्त्यांसह आज बुधवार दि. २१ रोजी मुंबईकडे रवाना होणार आहे. माजी मंत्री तथा खान्देशातील भाजपचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे हे गुरुवारी २२ ऑक्टोबर रोजी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात अधिकृतपणे कन्या तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन रोहिणीताईंसह प्रवेश करणार आहेत अशी माहिती अशी माहिती सुत्रांकडून पुढे आली आहे.

याबाबतची खात्रीशिर माहिती स्वतः खडसे व रोहिणी खडसे देत नसले तरीही, खडसे यांनी मात्र काही गोष्टी मलाही माहिती नसतात असे सूचक वक्तव्य केले आहे. मुंबईला बुधवारी जाणार असल्याच्या वृत्ताला खडसेंनी नकार दिला असला तरीही कार्यकर्ते जळगावातून मुंबई येथे रवाना होणार असल्याचे सांगत आहेत. खडसेंच्या पक्षांतरामुळे भाजपाला जिल्ह्यात ७० टक्के खिंडार पडणार असून खान्देशात भाजप खिळखिळी होण्याची चिन्हे आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या