Sunday, September 15, 2024
Homeजळगावखडसेंच्या काँग्रेसवरील आरोपाला पवारांच्या भेटीने बळ

खडसेंच्या काँग्रेसवरील आरोपाला पवारांच्या भेटीने बळ

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

- Advertisement -

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (District Bank Elections) काँग्रेसने गद्दारी (Betrayal by Congress) केल्याच्या आ. एकनाथराव खडसे (MLA Eknathrao Khadse) यांच्या आरोपाला मंगळवारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार (District Bank President Sanjay Pawar) आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार (Congress district president Pradeep Pawar)यांच्या भेटीने बळ मिळाल्याची चर्चा होत आहे. पवारद्वयींच्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठी धक्कादायक घटना ठरली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मदतीने संजय पवार यांनी राष्ट्रवादीचेच उमेदवार अ‍ॅड. रवींद्र पाटील यांना पराभूत केले. अ‍ॅड. रवींद्र पाटील यांचा पराभव हा राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसेंसाठी मोठा धक्का मानला गेला. या पराभवाचे खापर आ. एकनाथराव खडसे यांनी काँग्रेसच्या संचालकांवर फोडले होते. काँग्रेसच्या संचालकांनी गद्दारी केल्याचा आरोप त्यांनी केला होता. हे आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी फेटाळून लावले होते. तरी देखिल जिल्हा बँकेतील नाट्यमय निवडणुकीची चर्चा अजूनही होत आहे.

संजय पवार पोहोचले काँग्रेस भवनात

गत आठवड्यात जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी जिल्हा बँकेत त्यांच्या दालनात काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या खा. सोनिया गांधी यांची प्रतिमा लावली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास संजय पवार यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांची काँग्रेस भवनात येऊन भेट घेतली.

बंद दरवाजाआड झालेल्या या भेटीबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहे. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी ज्ञानेश्वर कोळी, सखाराम मोरे, जगदिश गाढे हे उपस्थित होते. दरम्यान संजय पवारांच्या या काँग्रेस जिल्हाध्यक्ष भेटीमुळे आ. खडसे यांच्या आरोपाला बळ मिळाल्याची चर्चा रंगत आहे.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी बँकेत खा. सोनिया गांधी यांची प्रतिमा लावली. त्यासाठी त्यांचे आभार मानायला जात होते. पण संजय पवार स्वत:च काँग्रेस भवनात सदीच्छा भेट घेण्यासाठी आले होते. त्यात वेगळी कुठलीही चर्चा झाली नाही.

प्रदीप पवार, जिल्हाध्यक्ष काँग्रेस

- Advertisment -

ताज्या बातम्या