Friday, May 3, 2024
Homeनाशिकवनविभागाकडून खैराचे लाकूड जप्त

वनविभागाकडून खैराचे लाकूड जप्त

सुरगाणा | प्रतिनिधी Surgana

तालुक्यातील गुजरात सीमावर्ती भागात वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पिंपळसोंड जंगलातील दगडपाडा या गुजरात सीमावर्ती जंगलात खैर लाकडाची एक पिक अप गाडीत खैराची लाकडे भरलेली असून ते चिंचमाळ, बर्डा, वांगण, करंजुल, मांधा या मार्गे जाणार असल्याचे समजल्यावर वनविभागाच्या कर्मचारी यांनी सापळा रचून गाडी ताब्यात घेतली.मात्र अंधाराचा फायदा घेत तस्कर तसेच चालक चावी गाडीतच सोडून पसार झाले. या वाहनावर कोणत्याही प्रकारचे नंबर आढळून आले नाहीत.

- Advertisement -

या पिंपळसोंड,तातापानी, चिंचमाळ, कुंभारचोंड, धुकट्या डोंगर या परिसरातून वर्षभरात बारापेक्षा जास्त चारचाकी वाहने खैर, सागवान लाकुड मालासह पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. यामध्ये खैर लाकडाचे सहा ते सात नग असून एक घनमीटर लाकुड जप्त केले आहे. त्याची किंमत बावीस हजार आठशे तीस रुपये आहे.

उंबरठाण वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास नागरगोजे यांनी तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी कंबर कसली असून सर्वच वाहने वणी येथील वनविभागात जमा करण्यात आली आहेत. या कामी वनरक्षक हिरामण थविल, आनंदा चौधरी, उमाजी पवार, वामन पवार, वन परिमंडळ अधिकारी द्रौपदा चौधरी, अविनाश छगने वन मजूर हरिचंद्र चौधरी, उखाराम चौधरी, छगन बागुल, रावजी चौधरी आदींनी यशस्वी कामगिरी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या