Saturday, July 27, 2024
Homeनगरखैरी निमगाव ग्रामपंचायतीत तिरंगी लढतीची शक्यता ?

खैरी निमगाव ग्रामपंचायतीत तिरंगी लढतीची शक्यता ?

खैरी निमगाव |वार्ताहर| Khairi Nimgav

श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय रंग आला आहे. सरपंचपदासाठी 8 तर तेरा सदस्य असलेल्या जागांसाठी 53 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. सरपंचपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. यावेळी होऊ घातलेल्या निवडणुकीत सरपंचपद वगळता ओबीसी प्रवर्गाच्या इंम्पीरिकल डेटा शासनाकडे नसल्याने लगतची म्हणजेच 2011 ची जनगणना ग्राह्य धरुन आरक्षणाची सोडत निघाली. त्यामध्ये प्रभागात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकही जागा मिळाली नाही. परिणामी ओबीसी बांधवांनी या सोडतीवर हरकत घेतल्याने प्रभाग 1 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री साठी 1 जागा देण्यात आली. यावेळी स्त्रियांना 7 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली असून निलेश परदेशी यांचा गट यावेळी नव्याने निवडणूक रिंगणात उतरला आहे. मागील सरपंच उज्वला शेजुळ तसेच अशोकचे संचालक आदिनाथ झुराळे, नितीन भागडे, राजेंद्र बनकर, विलास शेजुळ, सुरेश कालंगडे यांच्या गटानेही आपापले उमेदवार निवडणूक रिगंणात उतरवले आहे. आकड्यांचा हिशोब जुळल्यास सेवा संस्थेत आघाडी असणारे नितीन भागडे, आदिनाथ झुराळे, राजेंद्र बनकर यांच्या गटात ग्रामपंचायतीत देखील आघाडीचा निर्णय होऊ शकतो. तर दुसरीकडे शिवाजी शेजुळ, विलास शेजुळ, सुरेश कालंगडे यांच्या गटाने सध्या स्वतंत्र अर्ज भरले असले तरी अखेरीस हे स्वतंत्र लढणार कि आघाडी करणार किंवा यांच्यातील एखादा गट समोरच्या गटातील काहींना बरोबर घेऊन वेगळी भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे ह्या लढतीत चित्र काही दिसत असले तरी शेवटच्या टप्प्यात आघाड्या होऊन ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. नवख्या उमेदवारांचा भरणा जास्त असल्याने खैरी निमगावची निवडणूक प्रकाशझोतात आली आहे.

सरपंचपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्तीसाठी आरक्षीत असून सरपंच पदासाठी 8 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये दत्तात्रय वेणुनाथ झुराळे, दिपक चांगदेव झुराळे, निता नितीन भागडे, रामेश्वर निवृत्ती झुराळे, गणेश विश्वनाथ भाकरे, अरुण आण्णासाहेब काळे, निलेश बाळासाहेब परदेशी, शिवाजी आप्पासाहेब शेजुळ हे असून प्रभागात 13 जागांसाठी 53 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. अनुक्रमे प्रभाग क्रमांक 1 मध्ये 3 जागा आहे. अनुसूचित जाती प्रवर्ग स्त्री नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण प्रवर्ग व्यक्ती या करीता 10 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून यामध्ये वैशाली मधुकर बोरगे, अलका पुंजाराम बत्तीसे, सुशिला नानासाहेब तुपे, शैला सोमनाथ धुळगंड, वैशाली बाळासाहेब परदेशी, लता गौरीशंकर बनकर, भिमराज चांगदेव कोठुळे, विजय मदनसिंग परदेशी, अमोल किसन झुराळे, निलेश बाळासाहेब परदेशी हे आहेत.

प्रभाग क्रमांक 2 मध्ये 3 जागा असून सर्वसाधारण प्रवर्ग व्यक्ती, सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री, अनुसूचीत जमाती प्रवर्ग व्यक्ती यासाठी 15 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यामध्ये रामेश्वर निवृत्ती झुराळे, गणेश विश्वनाथ भाकरे, संदीप अशोक पोकळे, अरुण आण्णासाहेब काळे, कुंडलिक रेवजी काळे, शरद पुंजाहरी झुराळे, दत्तात्रय नारायण काळे, अच्युत बापु गायकवाड, हनुमान नारायण पवार, गोरक्षनाथ विठ्ठल मोरे, शोभा आदिनाथ झुराळे, सरीता संदीप पोकळे, दिपाली दत्तात्रय काळे, दत्तात्रय नारायण काळे, भामाबाई सखाहरी मेहेत्रे हे आहेत.

प्रभाग क्रमांक 3 मध्ये 2 जागा असून सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण प्रवर्ग व्यक्ती यासाठी 7 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून यामध्ये तुकाराम पर्वत काजळे, संतोष पाराजी भागडे, योगेश नामदेव शेजुळ, त्रिंबक बाळासाहेब उंदरे, प्रयागबाई तुकाराम काजळे, सुमन एकनाथ काळे, ताराबाई विजय काळे आहेत.

प्रभाग क्रमांक 4 मध्ये 2 जागा असून सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण प्रवर्ग व्यक्ती यासाठी 8 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून यामध्ये नारायण नामदेव कालंगडे, संजय भिकाजी कालंगडे, पुजा अमोल कालंगडे, अमोल चांगदेव कालंगडे, सुरेश संपत कालंगडे, अनिता सुरेश कालंगडे, अनिता अशोक कालंगडे, जिजाबाई वाघुजी झुराळे हे आहेत.

प्रभाग क्रमांक 5 मध्ये 3 जागा असून सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री, अनुसूचित जाती प्रवर्ग व्यक्ती यासाठी 13 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यामध्ये भाऊसाहेब विश्वनाथ पंडीत, बाबासाहेब अशोक पंडीत, नानासाहेब भानुदास तुपे, मदन गोपाळ तुपे, रोहिणी संजय तरस, निता नितीन भागडे, मंगल आप्पासाहेब झुराळे, कोमल विक्रमसिंग परदेशी, हिराबाई भागचंद उंदरे, कविता राजेश तांबे, अनिता सुभाष झुराळे, पुष्पा दिपक झुराळे, सुनंदा बाबासाहेब धाडगे हे आहेत. दरम्यान, माघारीनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. एकूणच जनतेतून सरपंच असण्याची ही दुसरी पंचवार्षीक असल्याने यावेळची निवडणूक एैतिहासीक ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या