Monday, March 31, 2025
Homeनगरखंडाळ्यात ट्रक उलटल्याने उसाखाली दबून महिलेचा मृत्यू

खंडाळ्यात ट्रक उलटल्याने उसाखाली दबून महिलेचा मृत्यू

खंडाळा |वार्ताहर| Khandala

श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर खंडाळ्यात उसाने भरलेला ट्रक उलटल्यामुळे त्याखाली दबून रस्त्यालगत चाललेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाल्याची घटना काल (शनिवार) संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. बाभळेश्वर-श्रीरामपूर-नेवासा मार्गे वळविलेल्या अवजड वाहतुकीचा ही महिला पहिला बळी ठरली आहे.

- Advertisement -

उसाने भरलेला (क्र. एम.एच.12 एच.सी.9666) हा दहा टायर ट्रक श्रीरामपूरकडून बाभळेश्वरकडे 6 वाजण्याच्या सुमारास जात होता. खंडाळ्यातील गणपती मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावरील कमानीजवळ ट्रक आल्यानंतर समोरुन येत असलेल्या अवजड वाहनामुळे चालकाने आपला ट्रक कडेला घेतला असता डाव्या बाजूला असलगल्या उतारामुळे उसाने भरलला हा ट्रक डाव्या बाजूने झुकून उलटला. त्याचवेळी रस्त्याच्या कडेने जाणारी खंडाळा येथील रहिवासी उषाबाई बाळासाहेब विघावे ही महिला ट्रकमधील उसाखाली दबली गेली.

तसेच मोटारसायकलवर जाणारे नर्सरी (बेलापूर) येथील दोघेजण जखमी झाले. मोठ्या वर्दळीत अपघात झाल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. घटनेत उसाखाली दबलेल्या महिला व पुरुष यांना काढण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न करून महिलेला तसेच दोन्ही जखमींना बाहेर काढले.

गावातील अमोल साबदे व मरकडे यांनी जेसीबी आणून ऊस बाजूला करण्यासाठी सहकार्य केले. यावेळी श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावरील वाहतूक लांब अंतरापर्यंत ठप्प झाली होती. यावेळी पोलीस यंत्रणेकडून वाहतूक काही काळ थांबून सुरळीत करण्यात आली. नगर-मनमाड रस्त्याची दुरुस्ती तसेच कोल्हार येथील पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक बाभळेश्वर मार्गे श्रीरामपूर अशी वळवण्यात आली आहे.त्यामुळे रहदारी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने वाहतुकीच्या कोंडीत मोठी भर पडली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : ३१ मार्च २०२५ – मानसिकता बदलाची अजूनही प्रतीक्षाच

0
मुलींच्या शिक्षणातील अडथळे अजूनही थांबायला तयार नाहीत. देशाची क्षमता वृद्धिंगत होण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 नुसार मुलींच्या शिक्षणाचा विशेष विचार केल्यास केंद्र सरकार सांगते. मुलींना...