जळगाव jalgaon
खान्देश जीन प्रेस असोसिएशन (Khandesh Gene Press Association) तर्फे 4 थी ऑल इंडिया कॉटन ट्रेड मीट 2022 (4 th All India Cotton Trade Meet 2022) चे यशस्वी आयोजन (organized) 18 सप्टेंबर रोजी जळगावात जैन हिल्स (Jain Hills) येथे करण्यात आले.
यंदाच्या ट्रेड मीटला संपूर्ण भारतातून स्पिकर्स, पाहुणे व प्रतिनिधी उपस्थिती दिली होती या संमेलनात 600 विविध प्रभागातून एकूण 600 डेलिगेट्स आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला अपर्णा भट यांच्या टीम द्वारे गणेश वंदनावर नृत्य प्रस्तुत झाले व खान्देशचा 100 वर्षांचा गौरवशाली कापसाचा इतिहास व संघटन वर मल्हार कम्युनिकेशन्स द्वारे निर्मित लघु फिल्म दाखविण्यात आली.
उदघाटन सोहळा अतुल जैन, जैन उद्योग समुह, भूपेंद्रजी राजपाल अध्यक्ष महाराष्ट्र जीनर्स असोसिशन, अतुलजी गणात्रा, अध्यक्ष ऑल इंडिया कॉटन असोसिएशन, उषा पोळ डेप्युटी डायरेक्टर टेक्सटाईल मिनिस्ट्री, भारत सरकार, प्रदीप जैन, अध्यक्ष – खान्देश जीन प्रेस असोसिशन, अरविंद जैन, जीवनअप्पा बयस, लक्ष्मन पाटील यांच्या उपस्थित पार पडला. या सत्रात कॉटन ट्रेड मीटचा स्मरणिकाचे प्रकाशन करण्यात आले
प्रदीप जैन यांनी प्रथम स्वागत व मनोगत व्यक्त केले. जीवनआप्पा बयास यांनी असोसिएशनची माहिती उपस्थितांना दिली. श्रीमती. उषा पोळ यांनी टेक्स्टाईल क्षेत्रात उपलब्ध शासकीय योजना व सबसिडी, नियमांची माहिती दिली व स्टॅटिस्टिकल डेटा चे महत्व सांगितले.
अतुल गणात्रा यांनी इंडियन कॉटन सिनारियो बद्दल मार्गदर्शन केले. जीनर्स ने जीनर्सला व्यवसाय करतांना कायदेशीर काँट्रॅक्त्त व अचूक फोरकास्टिंग करण्याचे महत्व सांगितले.
भूपेंद्रसिंह राजपाल यांनी कापसाची गुणवत्ता व कॉटन ट्रेड साठी काँट्रॅक्त्त चे एक मॉडेल प्रेक्षकांसमोर सादर केले. अतुल जैन यांनी शेतकर्याकडे लक्ष केंद्रित केले व पटवून दिले कि जर शेतकरी समृद्ध झाला त्याची आवक वाढली व सर्वांची प्रगती साधली. आज व्यवसाय करतांना शेतकर्यांपासून जीनर्स, स्पिनर्स, विव्हर्स सर्वांनी मिळून काम केले तरच सर्वांचा लाभ होणार आहे.
लोकांनी शुद्ध कॉटन चे महत्व वाढवायचे असेल तर प्रत्येकाला त्यात आपले योगदान द्यावे लागेल हे ही सांगितले. संस्थेचे अरविंद जैन यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
दुसर्या सत्रात श्री. दवे, रमन भल्ला ( एलडीसी ग्रुप ), राजन जिंदल, ललित महाजन ( वेलस्पन ) तसेच गोपाल अग्रवाल आणि ज्ञानेश्वर भामरे या सत्रात जागतिक कॉटन ट्रेंड सिनारियो व्यवसायातील तेजी, मंदी मध्ये स्वतःला कसे सुरक्षित ठेवायचे, हेजिंग बेनिफिट्स इन कॉटन यावर मार्गदर्शन करण्यात आले.
तिसर्या सत्रात सर्व प्रायोजकांचे असोसिएशनच्या पदाधिकार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. चौथ्या सत्रात बजाज स्टील इंड. तर्फे जीनर्ससाठी उपलब्ध आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज मशिनरीची माहिती देण्यात आली. बँक ऑफ महाराष्ट्र यांनी बँक सदैव जीनर्सच्या पाठीशी राहील व क्वालिटी म्हणजे काय याला विस्ताराने सांगण्याचा प्रयत्न केला.
पुढील सत्रात असोसिएशनतर्फे विविध अवार्ड प्रदान करण्यात आले. त्यात लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्ड ने हेमंत व प्रशांत संघवी तसेच अरुणभाई गुजराथी यांना सन्मानित करण्यात आले. या परिवाराने जिनींग प्रेसिंग क्षेत्रात 100 वर्षांचे योगदान देऊन खान्देशच्या कापसाच्या इतिहासाला गौरवान्वित केले आहे. या सोबत भूपेंद्रसिंह राजपाल यांना प्राईड एक्सपोर्टर अवार्ड, डॉ. बी डी जडे यांना कॉटन सायंटिस्ट व मोहन सिंह राजपूत यांना व्हाईट गोल्ड फार्मर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सत्रात अरुणभाईंनी कापसाच्या फुलाचे महत्व सांगितले. व व्यापार हा कायद्याने नव्हे तर विश्वासाने चालतो हे मत मांडले. शेतकर्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात कापसाच्या क्षेत्रात जास्त झाल्या आहेत. यावर संशोधन करण्याची गरज आहे. व बी टी कॉटन प्रचलित झाले पण त्यावर आता संशोधनाची गरज आहे यावर लक्ष वेधले.
पुढील चर्चा सत्रात टेक्स्टाईल फ्युचर ऑफ इंडियन कॉटन या विषयांवर मान्यवरांनी आपले मत मांडले. शेवटी दुसर्या राज्यातून आलेल्या मान्यवरांना स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. प्रिया जैन व सौ. स्वाती जैन यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन, आकर्षक सुटसुटीत व प्रेरक मांडणी मल्हार कम्युनिकेशन्स मार्फत करण्यात आली.