Tuesday, September 17, 2024
Homeनगरराज्यात चांगला पाऊस होवून शेतकरी सुखी होवू दे - आ. थोरात

राज्यात चांगला पाऊस होवून शेतकरी सुखी होवू दे – आ. थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

खांडेश्वर देवस्थान (Khandeshwar Devasthan) हे संगमनेर (Sangamner) तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असून वृक्षराईमुळे हा परिसर अत्यंत सुंदर झाला आहे. यावर्षी काही ठिकाणी चांगला पाऊस असून उर्वरित महाराष्ट्राला पावसाची गरज आहे. ईश्वर कृपेने राज्यभर सर्वत्र चांगला पाऊस (Rain) पडून शेतकरी व सर्वसामान्य नागरिक सुखी, समाधानी व आनंदी होऊ दे अशी प्रार्थना काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते तथा राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात (MLA Balasaheb Thorat) यांनी केली.

खांडगाव येथे श्रावण मासानिमित्त तिसर्‍या सोमवारी खांडेश्वर मंदिरात काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, देवस्थानचे अध्यक्ष लहानू गुंजाळ, सुरेश थोरात, रमेश गुंजाळ, अ‍ॅड. मधुकर गुंजाळ, सोमनाथ गुंजाळ, छाया गुंजाळ, विठ्ठल गुंजाळ आदिंसह खांडेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार थोरात (MLA Balasaheb Thorat) म्हणाले, खांडेश्वरला पिढ्यानपिढ्या लोक दर्शनासाठी येत आहेत. तीर्थक्षेत्र विकसित करण्यासाठी आपण सातत्याने निधी दिला असून त्या माध्यमातून हा परिसर सुंदर झाला आहे. दंडकारण्य अभियानातून या परिसरात चांगली वनराई झाली आहे. त्यामुळे सुंदर निसर्गसंपन्न वातावरणासह हा परिसर शांतता आणि स्वच्छतेमुळे भाविकांचे आकर्षण ठरला आहे. यावर्षी काही भागात पाऊस झाला. मात्र आपल्या सर्वांना पावसाची मोठी प्रतीक्षा आहे. अजून पावसाचे दिवस बाकी असल्याने ईश्वरचरणी प्रार्थना आहे की सर्व राज्यात चांगला पाऊस पडून राज्यातील सर्व जनता समाधानी, सुखी, आनंदी होऊ दे. प्रास्ताविक रमेश गुंजाळ यांनी केले तर मधुकर गुंजाळ यांनी आभार मानले. यावेळी खांडगाव व परिसरातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या