Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमPune Rave Party: खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट; आरोपींच्या आधी २...

Pune Rave Party: खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट; आरोपींच्या आधी २ ठिकाणी पार्टी

पुणे | Pune
पुणे शहरातील उच्चभ्रू वस्तीत मोठ्या थाटात सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी छापा टाकत धडक कारवाई केली आहे. खराडी येथील एका आलिशान फ्लॅटवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरसह सात जणांना ताब्यात घेतले आहे. पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यातील खराडीमधील पार्टीपूर्वी आरोपींच्या २ पार्टी करण्यात आल्याचे आता समोर आले आहे.

पुण्यातील खराडी परिसरातील लॉजवर रेव्ह पार्टी करण्यापूर्वी आरोपींनी २ ठिकाणी पार्टी केली होती. या रेव्ह पार्टीप्रकरणी ७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांच्या नवऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या पार्टी आधी आरोपींनी शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी ‘वार्मअप पार्टी’ केल्याचे उघड झाले आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी पार्ट्या केल्या होत्या. पहिली पार्टी कल्याणीनगरमधील एका पबमध्ये झाली. तिथे रात्री १.३० पर्यंत पार्टी सुरू होती. त्यानंतर दुसरी पार्टी मुंढवा परिसरातील पंचतारांकित स्टे बर्ड हॉटेलमध्ये झाली. या हॉटेलला रात्री ३ वाजेपर्यंत पार्टीची परवानगी होती. यानंतर सर्वजण खराडीतील एका फ्लॅटमध्ये गेल्याची माहिती आहे. याच फ्लॅटमध्ये पहाटे ५ वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी घटनास्थळी मद्याच्या बाटल्या, गांजा, हुक्का पॉट आदी प्रतिबंधित वस्तू आढळून आले.

YouTube video player

या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रेव्ह पार्टीसाठी खराडीमधील हॉटेलचे बुकिंग खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांनीच केले होते. प्रांजल खेवलकर यांच्या नावाने लॉजमधील या रूमचे बुकिंग करण्यात आले होते. हॉटेलच्या बुकिंगच्या पावत्या समोर आल्या आहेत. २५ ते २८ जुलै पर्यंत हे बुकिंग करण्यात आले होते. रूम नंबर १०१ आणि रूम नंबर १०२ प्रांजल खेवलकर यांच्या नावाने बुक होत्या. यासाठी त्यांनी १० हजार ३५७ रुपये लॉजचे बिल भरले होते. एका रूमचे बुकिंग २५ जुलै ते २८ जुलैपर्यंत आणि दुसऱ्या रूमचे बुकिंग २६ जुलै ते २७ जुलैपर्यंत करण्यात आले होते.

रेडिसन हॉटेलच्या मागील एका इमारतीत सुरू असलेल्या या पार्टीत दोन तरुणी आणि पाच पुरुष उपस्थित होते. या रेव्ह पार्टीत आणखी तीन महिलाही होत्या, मात्र छाप्यावेळी त्या तिथून पळून जाण्यात यशस्वी झाल्या असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी प्रांजल खेवलकरसह इतर आरोपींना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेले. खेवलकर याच्यासह आणखी एकाला अटक करण्यात आली असून, सातही जणांवर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ई-गव्हर्नस सुधारणेत महापालिका राज्यात पहिल्या दहामध्ये

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक जलद व सुरळीत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी, प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार ई- गव्हर्नस सुधारणा...