Thursday, December 12, 2024
Homeमुख्य बातम्याकडक उन्हाचा तडाखा अन् पावसाचा पाेबारा; बळीराजा चिंताग्रस्त

कडक उन्हाचा तडाखा अन् पावसाचा पाेबारा; बळीराजा चिंताग्रस्त

लखमापूर | बंडू खडांगळे | Lakhmapur

दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) सध्या कडक उन्हाचा तडाखा आणि पावसाने (Rain) केलेला पोबारा या समीकरणाने तालुक्यातील खरीप हंगाम धोक्याची घंटा वाजवत आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम हा बळीराजांला भयग्रस्त वाटू लागला आहे…

- Advertisement -

पावसाळ्यांची जवळजवळ 85 दिवस उलटून गेले तरी दमदार पावसांची हजेरी तालुक्यात न झाल्याने मोठ्या हिंमतीने पेरणी केलेल्या पिकांचे काय होणार? असा चिंताग्रस्त प्रश्न सध्या बळीराजाला भेडसावत आहे. धरणांचा तालुका, पावसांचे माहेरघर, इतर तालुक्यातील नागरिकांना पाणी देणारा दिंडोरी तालुका हा सध्या दुष्काळजन्य परिस्थिती जीवन जगत आहेत.

करोना कालखंडात आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकरी वर्ग यंदाच्या खरीप हंगामात आपली आर्थिक बाजू मजबूत करील अशी आशा असतांना झाले मात्र उलटे. त्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या बळीराजाला न्याय केव्हा मिळणार अशी आर्त हक्क तालुक्यातील शेतकरी वर्गातून निघत आहे.

‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत किस्सा खुर्चीचा! शरद पवार अन् ममता बॅनर्जींमध्ये नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

तालुक्यातील खरीप हंगाम पेरणीच्या क्षेत्रात जवळपास 95 ते 98 टक्के पेरणी ही पूर्ण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परंतु पावसाळ्यात फक्त दोन नक्षत्रे बरसले. व काही सर्व पावसांचे नक्षत्रे ही कोरडे गेल्याने पेरणी केलेल्या पिकांनी आता पिवळेपणा व करपयला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पाऊस जर नाही झाला तर यंदाचा खरीप हंगाम हा वाया जाणार या भीतीने तालुक्यातील बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.

अतिवृष्टी, अवकाळी परिस्थिती, दुष्काळ अशा नैसर्गिक संकटांतुन सावरण्यासाठी शासनाने यंदाच्या खरीप हंगामापासुन नाममात्र एक रूपयांमध्ये शेतकरी वर्गाला पिक विमा योजना सुरू केली.या योजनेला तालुक्यातील शेतकरी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला आहे. आपत्तीच्या काळात शेतकर्‍यांच्या पिकांला संरक्षण मिळावे म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली.

या योजनेत केंद्र, राज्य सरकार आणि शेतकरी यांच्या सामायिक हिश्श्यातुन शेतकर्‍यांना पीक विमा योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेत तालुक्यातील शेतकरी वर्गाने चांगले पाऊल उचलून प्रतिसाद दिला आहे. परंतु आता यंदाच्या या दुष्काळ जन्य परिस्थितीमुळे ही पीक विमा तालुक्यातील बळीराजाला आर्थिक संजीवनी ठरेल का? असे बोलले जात आहे.

आपण हळू हळू हुकूमशाहीकडे; मल्लिकार्जून खरगेंची मोदींवर सडकून टिका

खरिप पिकांनी टाकल्या माना

सध्या पावसांने आपला लहरीपणा दाखवत पोबारा केल्याने सर्वच पिकांनी माना टाकल्या असुन जमिनीला भेगा पडल्याने आता खरीप हंगामातील पिके भुईसपाट होणार असल्याचे चिन्हे पाहायला मिळत आहे.पाऊस पडण्याचे कुठलेच वातावरण तयार नसल्याने कडक उन्हाच्या तडाख्यात पिके आपल्या माना टाकत आहे. त्यामुळे यंदा मका, सोयाबीन, भुईमूग, मुग, बाजरी, ज्वारी यांच्या उत्पादनांवर यांचा विपरीत होणार असे भय निर्माण झाले आहे. वांगी, कोथिंबीर व इतर भाजीपाला ही कवडीमोल भावात विका लागत असल्याने बळीराजांच्या आर्थिक आधार तुटला आहे.तसेच सध्या पाऊस नसल्याने जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर उदभवत असल्याने त्यांचा दुध व्यवसायांवर विपरीत प्रमाण दिसून येत आहे.

One Nation One Election विशेष अधिवेशन काळात दिल्ली सोडू नका; केंद्र सरकारचे सर्व अधिकारी, सचिवांना आदेश

दिंडोरी तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसांने आपला लहरीपणा दाखवल्यामुळे तालुक्यातील संपूर्ण गावांमधील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. त्यामुळे बळीराजांवर आर्थिक कोंडीची संकटमय मालिका तयार झाली आहे. यातुन शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी मायबाप सरकारने व शासनाने सक्तीची बँक वसुली थांबवी त्यामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळेल.

संतोष रहेरे, माजी सरपंच अंबानेर

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मृत्यूने खळबळ; राहत्या घरी संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या