Friday, June 21, 2024
Homeमुख्य बातम्याआज खरीप हंंगाम आढावा बैठक

आज खरीप हंंगाम आढावा बैठक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिक विभागाची खरीप हंंगाम आढावा बैठक (दि.4) होत आहेे. यंदा मागणीनुसार रासायनिक खताचा पुरवठा होतो का नाही? पऊस वेळेवर पडतो की नाही? पुरेसा कर्ज पुरवठी होईल की नाही? असे विविध प्रश्न शेतकर्‍यांना भेडसावत आहेत. त्यावर कृषी मंंत्री अब्दुल सत्तार काय निर्देश देतात याकडे सर्वांंचे लक्ष लागले आहे.

गेल्या वर्षापासून कीटकनाशक आणि तणनाशकांच्या किंमतीत वाढ झाली आहे. ऐन वेळी उत्पादकांनी रासायनिक औषधे आणि तणनाशकाच्या दरामध्ये जवळपास दुपटीने वाढ केली. निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक बेभरवशाचे असले तरी पेरणीपूर्वी खतावर आणि कीटकनाशकावर खर्च हा ठरलेला आहे. दरवाढीमुळे उत्पादन महागडे होत आहे.यंदाच्या खरीप हंगामावर अल-निनोचे सावट आहे. पाऊसमान कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम अजूनही जाणवत आहे. गेल्या वर्षापासून रासायनिक खताच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. रशिया-युक्रेन युध्दामुळे रासायनिक खताचा पुरवठा अनियमित झाला होता. मागणीनुसार पुरवठा न झाल्यामुळे दरात वाढ झालीे. केंद्राकडून दिलासा देण्याचा प्रयत्न असला तरी स्थानिक पातळीवर दरवाढीचा सामना हा करावाच लागतो. तर दुसरीकडे रासायनिक खताबरोबर फवारणीसाठी लागणार्या औषधांचे आणि तणनाशकाचे दर दुपटीने वाढले आहेत.त्यामुळे यंदाही खरिपात महागाईचा सामना अटळ दिसत आहे. त्या प्रमाणात पीक कर्ज उपलब्ध होणे गरजेचे आहे.

जिल्हा बॅक अडचणीत असल्याने राष्ट्रीयकृत बँकांवर अवलंबुन राहावे लागत आहे. त्यासाठी प्रत्येक गावात कर्ज मागणी अर्ज भरुन घेऊन त्या प्रमाणे कर्ज दिले तर सोय होईल.अशी शेतकर्यांची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी 3650 कोटी रुपये पिक कर्जाचे उदिष्ट होते. त्यात जिल्हा बँक 579 कोटी 23 लाख, राष्ट्रीय बँका 2 हजार 462 कोटी 68 लाख, खासगी 597 कोटी 75 लाख देणार होते. यंदा त्यात वाढ करावी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या