नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
राष्ट्रपती भवनात शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध क्रीडा स्पर्धांत २०२४ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारताची नेमबाज अन् ऑलिम्पियन मनू भाकरसह जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी. गुकेश यांना क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मेजर धान्यचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मनू भाकर ही देशातील सर्वोत्तम नेमबाजपटू आहे. २०२४ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत मनू भाकरनं वैयक्तिक आणि मिश्र इवेंटमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. तिच्या या सर्वोत्तम कामगिरीबद्दल तिला देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याशिवाय भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगलाही देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हरमनप्रीत सिंग हा भारतीय हॉकी संघाचा भाग होता, ज्याने टोकियो आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्येही संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकीने मोठे यश संपादन केले. ज्यामुळे त्याला हा सन्मान देऊन गौरविण्यात आले.
त्यासोबतच, महिला हॉकी संघाची कर्णधार सलीमा टेटे यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. नेमबाज स्वप्नील कुसाळे याला अर्जुन पुरस्कार तर दीपाली देशपांडे यांना द्रौणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही गुरु-शिष्याची जोडी महाराष्ट्रातील आहे. याच समारंभात पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता उंच उडीपटू प्रवीण कुमारलाही मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रवीण कुमारने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते, जे त्यांच्या समर्पण आणि मेहनतीचे प्रतीक आहे. यावेळी ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यापैकी १७ पॅरा ऍथलीट होते. २ जणांना जीवनगौरव श्रेणीतील अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच ५ प्रशिक्षकांना द्रौणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या खेळाडूंना मिळाला अर्जून पुरस्कार
अर्जुन पुरस्कार विजेत्यांमध्ये पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कुस्तीपटू अमन सेहरावत, नेमबाज स्वप्नील कुसाळे, सरबज्योत सिंग आणि पुरुष हॉकी संघाचे सदस्य हरमनप्रीत सिंग, सुखजीत सिंग, संजय आणि अभिषेक यांचा समावेश आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा