Friday, May 3, 2024
Homeनाशिकखुटवड नगर ते माऊली लॉन्स परिसर प्रतिबंधित

खुटवड नगर ते माऊली लॉन्स परिसर प्रतिबंधित

नवीन नाशिक । New Nashik

बाधित रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने करोनाची साखळी तोडण्यासाठीस्थानिक रहिवासी व लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार खुटवड नगर हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला. त्यामुळे आता आयटीआय पूल ते माऊली लॉन्सपर्यंतचा मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे. खुटवड नगर, वावरे नगर, सिद्धटेक नगर, वृंदावन नगर, विठ्ठल नगर, चाणक्य नगर, जाधव संकुल, मोगल नगर, आम्रपाली लॉन्स परिसर या भागात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

- Advertisement -

बाजारात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी दिसते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. या भागात प्रभाग क्रमांक 28 चा भाग तसेच सातपूर विभागात जोडलेला प्रभाग क्रमांक 26 च्या काही भागांचा समावेश आहे. संबंधित परिसर आजपासून 14 दिवस बंद करण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका हर्षदा गायकर यांच्या संपर्क कार्यालयात नगरसेवक मनपा अधिकारी व नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी बैठकीचा अहवाल मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांना पाठविण्यात आला. त्यानंतर आयुक्त गमे यांनी अत्यावश्यक सेवा सोडून खुटवडनगर परिसर पुढील आदेश येईपर्यंत

प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले.

यावेळी नवीन नाशिक प्रभाग सभापती दीपक दातीर, नगरसेविका सुवर्णा मटाले, अलका आहिरे, प्रतिभा पवार, नवीन नाशिक विभागीय अधिकारी संदेश शिंदे, सातपूरचे विभागीय अधिकारी गायकवाड, माजी नगरसेवक तानाजी जायभावे, संदीप गायकर, दीपक मटाले, आरोग्य अधिकारी, डॉ. छाया साळुंखे, दामोदर मटाले, अशोक होळकर आदी उपस्थित होते.

माऊली लॉन्स व खुटवड नगर येथे पोलीस प्रशासनाने बेरिकेडस् लावून या परिसरात येण्या-जाण्यासाठी नागरिकांना बंदी केली आहे. मेडिकल दुकान वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्याचे यावेळी आदेशित करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या