Sunday, November 24, 2024
Homeमनोरंजनकियाराच्या हातावर आज सजणार मेहंदी; 'असा' आहे शाही विवाह सोहळ्याचा थाट

कियाराच्या हातावर आज सजणार मेहंदी; ‘असा’ आहे शाही विवाह सोहळ्याचा थाट

मुंबई | Mumbai

बॉलिवूडमधील (Bollywood) चर्चित जोडी सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) ​​आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) लवकरच विवाहबंधनात (Marriage) अडकणार आहेत.

- Advertisement -

एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी ह्या चित्रपटाच्या (movie) माध्यमातून प्रेक्षकांच्या पसंतीला आलेली कियारा आणि सिद्धार्थ यांचा ६ फेब्रुवारीला राजस्थानच्या (Rajasthan) जैसलमेर येथे शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. यासाठी दोघांचे कुटुंबिय आणि जवळच्या मित्रांना निमंत्रित करण्यात आले आहे.

आजपासून या शाही लग्न सोहळ्याचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू (Pre-wedding functions) होत असून यामध्ये कियाराला सिद्धार्थच्या नावाची मेहंदी आणि हळद लावली जाणार आहे. या विधीसाठी विशेष तयारी देखील करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, मेहंदी आणि हळदीनंतर संध्याकाळी एका भव्य संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood celebrities) आपली अदा सदर करणार असल्याचे कळते. याशिवाय हळदी आणि मेहंदी विधीनंतर सोमवारी ६ फेब्रुवारीला कियारा आणि सिद्धार्थ जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये (Suryagad Palace of Jaisalmer) सात फेरे घेऊन कायमचे एकमेकांचे होतील. लग्नानंतर ७ फेब्रुवारीला ग्रॅण्ड पार्टीही होणार आहे.

शाही विवाह सोहळ्याची जय्यत तयारी

कियाराच्या ब्रायडल मेकअप आणि कॉस्च्युम डिझाइनसाठी विशेष तयारी करण्यात आली असून वेडिंग ड्रेससाठी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​आणि मेक-अपसाठी स्वर्णलेखा गुप्ता विवाहाच्या ठिकाणी पोहोचल्या आहेत. तसेच कियाराचे हेअरस्टायलिस्ट अमित ठाकूर आणि बॉलीवूडची मेहंदी डिझाइन क्वीन वीणा नागडा देखील लग्नाच्या ठिकाणी पोहोचली आहेत. त्यासोबतच वेडिंग शूट कव्हर करण्यासाठी विशाल पंजाबी त्याच्या संपूर्ण टीमसह जैसलमेरमध्ये दाखल झाले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या