Wednesday, April 30, 2025
Homeमुख्य बातम्याबंदुकीचा धाक दाखवून व्यावसायिकाचे अपहरण

बंदुकीचा धाक दाखवून व्यावसायिकाचे अपहरण

नाशिक | प्रतिनिधी

फॅब्रिकेशनचा व्यवसाय करणाऱ्यास पिस्तूलाचा धाक दाखवून चौघांनी अपहरण केले. त्यानंतर चौघांनी व्यावसायिकास मध्यप्रदेश येथे नेत १२ लाख ३० हजार रुपयांची खंडणी उकळल्याची घटना उघडकीस आली आहे.

- Advertisement -

म्हसरुळ पोलिस ठाण्यात राजेशकुमार गुप्ता (३९, रा. उपेंद्रनगर, सिडको) यांनी चौघांविराेधात अपहरण, खंडणीची फिर्याद दाखल केली आहे.फिर्यादीनुसार, गुप्ता यांना संशयितांनी त्यांना पिस्तूलचा धाक दाखवून कारमध्ये बळजबरीने बसवले. अपहरणकर्त्यांनी गुप्ता यांना त्यांच्या मध्यप्रदेश येथील देवास या मुळगावी नेले. तेथे अपहरणकर्त्यांनी गुप्ता यांच्याकडे पैशांची मागणी केली.

त्यानुसार गुप्ता यांच्याकडून अपहरणकर्त्यांनी एटीएममधून ३० हजार रुपये व रोख स्वरुपात १२ लाख रुपये घेतल्याचे उघड झाले. पैसे मिळाल्यानंतर संशयितांनी गुप्ता यांना बसस्थानकावर सोडून पळ काढला. नाशिकला परतल्यानंतर गुप्ता यांनी म्हसरुळ पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी म्हसरुळ पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे तपास करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘प्रवरे’च्या आजी-माजी संचालकांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण ?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात साडेआठ कोटींच्या बोगस कर्जमाफी प्रकरणी आजी-माजी संचालक, साखर आयुक्त पुणे, संबंधित दोन...