Thursday, June 13, 2024
Homeब्रेकिंग न्यूजखून करून मृतदेह टाकला विहिरीत; दोघा संशयितांवर गुन्हा दाखल

खून करून मृतदेह टाकला विहिरीत; दोघा संशयितांवर गुन्हा दाखल

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

तीक्ष्ण हत्याराने खून करत मृतदेह विहिरीत टाकुन पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अनिल पोपट गायकवाड (वय-३५, रा. तिल्लोळी, कोचरगाव, ता. दिंडोरी) याचा मृतदेह त्याच्या घरापासून काही अंतरावरील दौलत मधुकर मोरे यांच्या विहिरीत आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. तपासणीअंती अनिलच्या डोके व हातावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्याचा खून करत पुरावा नष्ट करण्याहेतूने त्याचा मृतदेह, विहिरीत टाकुन दिल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.

नाना पोपट गायकवाड (रा. दुगाव) यांच्या तक्रारीवुन दिंडोरी पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीसह सागर देवचंद टोंगारे (रा. रवळगाव, ता. दिंडोरी) या दोघांविरोधात खून करुन पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अनैतिक संबंधांतून हा खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या