Monday, October 14, 2024
Homeनगरकायनेटिक चौकात दोन घरे फोडली

कायनेटिक चौकात दोन घरे फोडली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अज्ञात चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी करून रोख रक्कम, सोन्याचे दागिणे असा 32 हजार 800 रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. कायनेटिक चौकातील सुखकर्ता कॉलनीमध्ये शनिवारी रात्री 10 ते रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

चंद्रकांत कचरू जठार (वय 44) यांनी फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी फिर्यादी यांच्यासह श्रीराम विजयकुमार कुर्‍हाडे यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून सोन्याचे दागिणे व रोख रक्कम चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस नाईक शिंदे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या