Thursday, September 10, 2026
Homeक्राईमPathardi : काकडे खूनप्रकरणातील आरोपींची संख्या सातवर

Pathardi : काकडे खूनप्रकरणातील आरोपींची संख्या सातवर

आणखी तीन जणांचा सहभाग उघड || न्यायालयाकडून चार आरोपींना वाढीव पोलीस कोठडी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील धामणगाव देवीचे येथील किरण आप्पासाहेब काकडे यांच्या खूनप्रकरणातील तपासात महत्त्वाची प्रगती झाली असून या गुन्ह्यात आणखी तीन जणांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता सात झाली आहे. मंगळवारी (23 जून) चार आरोपींना पाथर्डी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली.

- Advertisement -

याप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी यापूर्वी विशाल राजेंद्र भोसले (रा. कसबा पेठ), अमोल शिवाजी पवार (रा. नाथनगर), सत्यम अशोक जेधे (रा. हंडाळवाडी) आणि चैतन्य नागेश भोसले (रा. कसबा पेठ) या चौघांना अटक केली होती. त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.तपासादरम्यान इरफान उर्फ टील्या, सोहेल खलिफा आणि जुबेर शेख (सर्व रा. पाथर्डी) यांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे या खूनप्रकरणातील आरोपींची संख्या सातवर पोहोचली आहे. या प्रकरणात आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

किरण काकडे यांच्या हत्येमागे गाडीच्या काचा फोडल्याच्या कारणावरून झालेला वाद असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या रागातून आरोपींनी काकडे यांना बेदम मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. न्यायालयात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. अनिल विधाते यांनी बाजू मांडली, तर आरोपींच्यावतीने अ‍ॅड. रा. ना.खेडकर, अ‍ॅड. प्रसाद सुपेकर, अ‍ॅड. प्रणव देवडे आणि अ‍ॅड.शाहरुख शेख यांनी काम पाहिले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन दराडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बडे हे सहकार्य करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : डिंभे-माणिकडोह बोगद्यावरून पुन्हा प्रादेशिक वादाची ठिगणी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या मुद्द्यावरून नगर आणि पुणे जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा सुरू असतानाच, नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याप्रकरणी आपली आक्रमक आणि ठाम भूमिका स्पष्ट केली...