Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याKirit Somaiya : किरीट सोमय्या पुन्हा मैदानात; उद्धव ठाकरेंवर केला घोटाळ्याचा गंभीर...

Kirit Somaiya : किरीट सोमय्या पुन्हा मैदानात; उद्धव ठाकरेंवर केला घोटाळ्याचा गंभीर आरोप

मुंबई | Mumbai

काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्यांचा (Kirit Somaiya) कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने ते अडचणीत सापडले होते. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी काही दिवस कुठल्याही घडामोडींवर भाष्य केले नव्हते. मात्र आता किरीट सोमय्या (Kirit Somaiya) पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचे चित्र आहे…

- Advertisement -

किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडून करोना काळात मुलुंड येथील कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.याबाबत किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केले आहे.

ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘उद्धव ठाकरे व महाराष्ट्र सरकारने रिचार्डसन क्रूडास या भारत सरकारच्या कंपनीकडून मुलुंड येथील जागा ताब्यात घेतली. सिडकोला तात्पुरते हॉस्पिटल बांधून देण्याचे आदेश दिले. सिडकोने ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनीला 1850 खाटांचे हॉस्पिटल बांधण्याचे आदेश दिले. ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनी एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती.’

Sanjay Raut : “लक्षात ठेवा एनडीएचा सर्वात मोठा पराभव महाराष्ट्रातच होणार”; संजय राऊतांचे विधानदुसऱ्या पक्षात जाण्याच्या चर्चेवर रविकांत तुपकर यांचे स्पष्टीकरण; म्हणाले…

7 जुलै 2020 ते 31 जुलै 2022 असे 25 महिने हॉस्पिटल चालू ठेवण्यात आले. त्यासाठी भाड्यापोटी ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनीला 90 कोटी रुपये देण्यात आले. बांधकामासाठी 10 कोटी रुपये दिले असे मिळून 100 कोटींचा घोटाळा उद्धव ठाकरे यांनी केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

रिचार्ड्सन कृडास कंपनी कडून भाड्याने घेण्यात आलेल्या जमिनीचा एकही पैसा देण्यात आला नाही, असाही आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या संदर्भात किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस, आयकर विभाग, ईडी कार्यालय यांना तक्रार दिल्याचे म्हटले आहे. या कोविड सेंटर प्रमाणे मुंबई मधील 15 कोविड सेंटरसाठी 700 कोटी रुपये भाडे घोटाळे करण्यात आले आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फुट नाही; शरद पवार गटाचा निवडणूक आयोगाकडे युक्तिवाद

- Advertisment -

ताज्या बातम्या