Thursday, September 12, 2024
Homeनंदुरबारसैन्य दलातून कर्तव्य बजावून परतलेल्या किशोर पाटलांचा सत्कार

सैन्य दलातून कर्तव्य बजावून परतलेल्या किशोर पाटलांचा सत्कार

मोदलपाडा/सोमावल Modalpada / Somaval । वार्ताहर –

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव The nectar festival of Indian independence दिनानिमित्त Jammu and Kashmir, Siachen भागातून 17 वर्ष कर्तव्य बजावून आलेले मराठा बटालियन Maratha Battalion मधील हवालदार किशोर पाटील Constable Kishore Patil यांचा सेवापूर्ती सोहळा Service Ceremony संस्कृती बहुउद्देशीय सेवा मंडळ Culture Multipurpose Service Board नंदुरबार यांच्यामार्फत आयोजित करण्यात आला होता.

- Advertisement -

यावेळी त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. बर्फाळ प्रदेशातील रक्त गोठवणार्‍या थंडीत देशाच्या विविध भागातील 17 वर्षातील सीमेवर आलेले प्रत्यक्ष अनुभव त्यांनी सांगितले. नंदुरबार जिल्ह्यातील तरुणांना जास्तीत जास्त संख्येने आर्मी, नेव्ही,पॅरामिटर फोर्स, व सैन्य भरतीत जाण्याचे आवाहन केले.

यावेळी भारतमातेचे वैभव अजरामर ठेवण्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शाहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुजाता साळवे यांनी केले. सूत्रसंचालन कदम यांनी केले.

यावेळी संस्कृती बहुउउद्देशीय सेवा मंडळाचे अध्यक्ष मिलिंद धोदरे, सचिव श्रीमती सुजाता साळवे, जि.प.केंद्र शाळा राजविहिर येथील मुख्याध्यापक वाघंबर कदम, उपशिशिका सौ.सोनाली पाटील, यश धोदरे, संस्कृती धोदरे आदी विद्यार्थी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या