Tuesday, March 25, 2025
Homeजळगावकिशोर पाटलांच्या लेकरांनी प्रचाराची धुरा घेतली खांद्यावर

किशोर पाटलांच्या लेकरांनी प्रचाराची धुरा घेतली खांद्यावर

पाचोरा । प्रतिनिधी

सध्या विधानसभा निवडणुकीचा ज्वर वाढत चालला आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघात आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मुलगा सुमित किशोर पाटील व लेक डॉ.प्रियंका पाटील यांनी वडिलांसाठी मतदारसंघ पालथा घातला आहे. मुलांनी दोन्ही तालुक्यातील प्रत्येक गावात प्रचार फेरी पुर्ण केली आहे. त्यांना प्रचारात प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

- Advertisement -

पाचोरा-भडगाव मतदार संघात राजकीय वातावरण प्रचंड तापलेले आहे. सर्वच उमेदवार मतदारसंघ पायाखाली घालत आहे. मात्र त्यात आमदार तथा महायुतीचे उमेदवार आप्पा पाटील यांची लेक डॉ.प्रियंका पाटील व पुत्र सुमित पाटील याने मतदारसंघ पिंजून काढला. आ.किशोर पाटील यांची कन्या डॉ.प्रियंका पाटील यांनी 18 ऑक्टोबर पासून हरेश्वर पिंपळगाव येथून प्रचाराचा शुभारंभ केला. त्यानंतर संपुर्ण पाचोरा तालुका 21 दिवसात त्यांनी घरोघर पिंजून काढून बापासाठी मत मागीतले. प्रत्येक गावात शेकडोंनी रॅली निघाल्या. डॉ.प्रियंका पाटील म्हणाल्या की मला प्रत्येक गावात मिळालेले प्रेमाने भारावून गेल्याचे सांगीतले. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन, जय बारांवकर, जिल्हाप्रमुख विद्यार्थी सेना समवेत सूरज शिंदे, राहुल पाटील, विशाल पाटील, समीर शेख, यश ठाकूर, सागर महाजन तथा संपूर्ण शहर व ग्रामीण शिवसेना, युवासेना पदाधिकारी त्यांचे युवा सेनेचे सर्व सहकारी प्रचारात सहभागी झाले.

किशोर आप्पा पाटील यांचे पुत्र सुमितने ही 18 ऑक्टोबर पासून भडगाव तालुक्यात प्रत्येक घरोघरी जाऊन मतदारांचे आशिर्वाद घेतले. किशोर आप्पांनी आमच्या गावाचा विकास केला आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या वडिलांसोबत असल्याचे ग्वाही मतदारांनी दिल्याचे सांगीतले. ग्रामिण भागात त्यांचा शंभर टक्के दौरा पुर्ण झाला असून शहरात दोन दिवसापासुन प्रचाराला प्रारंभ केला आहे. त्याच्यां समवेत पुरुषोत्तम माळी जिल्हा समन्वयक युवासेना निलेश पाटील जिल्हासघटक युवासेना नितीन महाजन उपशहरप्रमुख शिवसेना योगेश सुर्यवंशी तालुका सरचिटणीस युवासेना अनिल महाजन समाधान पाटील जगदीश पाटील स्वप्निल पाटील तालुकासंघटक शिवसेना रविंद्र हिम्मत पाटील राहुल पाटील यांच्यासह युवासेनेच्या पदाधिकार्यानी सहभाग नोंदवला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...