Sunday, April 27, 2025
Homeब्रेकिंग न्यूजकिशोरसागर धरण तुडूंब; शेतकर्‍यांना दिलासा

किशोरसागर धरण तुडूंब; शेतकर्‍यांना दिलासा

देवळा । प्रतिनिधी Deola

- Advertisement -

पाणलोट क्षेत्रासह परिसरात संततदार होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे चणकापूर धरण 87% भरले आहे यामुळे चणकापूर उजव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेल्या पूर पाण्याने रामेश्वर किशोरसागर धरण ओहरफ्लो झाले असून या धरणातून पूर्वभागासाठी वाढीव उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने या भागातील नागरिकासह शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

गेल्या वर्षी देवळा तालुका परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने पूर्व व पश्चिम भागातील नागरिकांना त्रिव दुष्काळाचा सामना करावा लागला . पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ अनेक गावातील ग्रामस्थांवर येऊन ठेपली होती उन्हाळ्यात पिण्यासाठी वाढीव कालव्याला पाणी सोडण्यात आल्यावरही ते उमरण्यापर्यंत पोहचू न शकल्याने पाणीटंचाईने त्रस्त ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती पाण्यासाठी आंदोलनाचा पवित्र पवित्रा ग्रामस्थांतर्फे घेण्यात आल्यानंतर प्रशासन यंत्रणेद्वारे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता.

दरम्यान, यावर्षी चणकापूर धरण क्षेत्रात समाधान कारक पाऊस झाल्यामुळे उजव्या कालव्याला पूर पाणी सोडण्यात आले आहे . या पूर पाण्याने 19 दिवसात रामेश्वर -किशोर सागर धरण ओहरफ्लो झाल्याने वाढीव उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले . यामुळे पूर्व भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु असल्याने खर्डे परिसराला वरदान ठरणारे वार्शी धरण ओहरफ्लो झाले असून , कोलथी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने ते पाणी आता थेट रामेश्वर धरणात पडणार आहे . यामुळे रामेश्वर धरणातून आता पूर्व भागाला पुरेशा प्रमाणात पाणी मिळेल अशी अपेक्षा पिपंळगाव, दहिवड, उमराणे आदी पूर्वभागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...