पारनेर | प्रतिनिधी | Parner
के.के.रेंज भूसंपादन होणार नाही असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज दिल्ली येथे झालेल्या बैठकीत स्पष्ठ केले. खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, आमदार निलेश लंके, वनकुटे सरपंच राहुल झावरे, जिल्हा परिषद सदस्य धनंजय गाडे, पंचायत समिती सभापती अण्णा सोडणर तसेच संरक्षण विभागाची सचिव, अधिकारी यांची मीटिंग संरक्षण मंत्रालय दिल्ली येथे पार पडली.
बैठकीमध्ये खासदार शरद पवार साहेब यांनी भूसंपादन करण्यास विरोध केला. भूसंपादन झाल्यास ह्या भागातील शेतकरी विस्थापित होतील तसेच मुळा धरण, कृषी विद्यापीठ झाल्यामुळे लोकांचे पहिलेच विस्थापन झाले आहे. मुळा ड्याम असल्यामुळे हा भाग बागायती झालेला आहे. ह्या भागातील प्रमुख पीक डाळिंब, ऊस असून त्यामुळे स्थलांतर शक्य नाही. तसेच गायी, शेळ्या, मेंढ्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे स्थलांतर करणे शक्य होणार नाही असे पवार साहेब यांनी संरक्षण मंत्र्यांना निर्दशनास आणून दिले.
तसेच गेल्या चार दिवसांपासून या अति महत्वाच्या प्रश्नावर तुमची भेट घेण्यासाठी आमचे आमदार निलेश लंके हे दिल्लीत थांबून होते हे ही पवार साहेबांनी संरक्षणमंत्री यांना आवर्जून सांगितले. तसेच आमदार निलेश लंके यांनी माझ्या मतदारसंघात खारे कर्जुले हे गाव असून येथील अनेक महिला विधवा झालेल्या आहेत. गोळीबाराच्या काळात लोकांनी संरक्षण क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे अनेकांचे प्राण गेले आहेत. तसेच के.के.रेंज क्षेत्रातील गावांत एकही नॅशनलाईज बँक फायनान्स कंपन्या लोन देत नाही. नवीन प्रोजेक्ट त्यामुळे होत नाहीत संरक्षणकुळ हा सातबारा उतारा येत असल्यामुळे कोणताही विकास त्या गावांचा होत नाही.
त्यावर संरक्षणमंत्र्यांनी वित्तीय संस्था फायनान्स यांच्यासोबत आपली व संरक्षण विभागाची एकत्र मीटिंग घडून आणू त्यामुळे कर्ज देण्यास काही अडचण येणार नाही असे सांगितले. तसेच आमदार लंके यांनी या भागात आदिवासी लोकांची संख्या 60 टक्के असून हे बरेच लोक वनविभागाच्या हद्दीत राहतात त्यांचे उपजीविकेचे साधन अवलंबून आहे, त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते असे निदर्शनास आणून दिले. त्यावर यापुढे या बाबतीत कोणताही निर्णय घेत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी, संरक्षण अधिकारी व ग्रामस्थ यांमधे सर्व प्रथम बैठक होईल अशी ग्वाही संरक्षणमंत्री यांनी दिली. जवळ जवळ ही मिटिंग पन्नास मिनिटे चालली मीटिंगमध्ये सरपंच राहुल झावरे, जिल्हा परिषद सदस्य धनंजय गाडे पंचायत समिती सभापती राहुरी अण्णा सोडणार उपस्थित होते.