Monday, November 25, 2024
Homeक्रीडाकोलकात्यासमोर पंजाबच्या किंग्जचे आव्हान

कोलकात्यासमोर पंजाबच्या किंग्जचे आव्हान

मुंबई | Mumbai

ड्रीम इलेव्हन आयपीएलमध्ये शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे.

- Advertisement -

हा सामना श अबूधाबीच्या शेख झायद मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

पंजाबी छोले भटुरे आणि मिस्टी दही यापैकी कोणता संघ बाजी मारतो? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पंजाब संघाचे ६ सामन्यात १ विजय आणि ५ पराभवांसह २ गुण आहेत. तर कोलकात्याच्या ताफ्यात ६ गुण आहेत गुणतालिकेत शेवटच्या तर कोलकाता चौथ्या स्थानावर आहे.

पंजाबविरुद्ध विजय संपादन करून विजयी चौकार मारण्याचा कोलकाता संघाचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे कोलकात्याला नमवून स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदवण्यासाठी पंजाब संघाने कंबर कसली आहे. अखेरच्या सामन्यातील चैन्नईविरुद्धच्या विजयाने कोलकात्याचे हौसले बुलंदीवर आहेत.

कोलकाता संघाच्या फलंदाजीची मदार सुनील नारायण , शुभमन गील ,राहुल त्रिपाठी, निखिल नाईक, इऑन मॉर्गन, टॉम बँटन, नितीश राणा, रिंकूसिंग , यांच्यावर आहे. तर अष्टपैलूंमध्ये क्रिस ग्रीन, आंद्रे रसेल, सुनील नारायण आहेत. गोलंदाजीची मदार प्रसिध कृष्णा, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, लोकी फर्गसन, पॅट कमिन्स यांच्यावर आहे.

पंजाब संघाबद्दल सांगायचे झाले तर सलामीवीर लोकेश राहुल, निकोलस पुरण, मयंक अगरवाल चांगली कामगिरी करत आहेत. हैद्राबादविरुद्ध सामन्यात पंजाब संघाचे लोकेश राहुल, मयंक अगरवाल संघाला चांगली सुरुवात करून देण्यात अपयशी ठरले होते.

डावखुरा फलंदाज निकोलस पुरण याने एकाकी झुंज देत संघाला विजयाच्या समिप नेण्यासाठी प्रयत्न केले. पण त्याचे प्रयत्न पंजाबचा पराभव टाळू शकले नाहीत. शिवाय पंजाब संघाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल अद्याप आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही.

त्याच्याजागी क्रिस गेल याला अंतिम ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. गोलंदाजीत रवी बिष्णोई , चांगली गोलंदाजी करत असून, त्याला इतर गोलंदाजांची साथ मिळणे गरजेचे आहे.

– सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या