Saturday, May 4, 2024
Homeक्रीडाकोलकातासमोर बंगळूरचे रॉयल चॅलेंज

कोलकातासमोर बंगळूरचे रॉयल चॅलेंज

मुंबई | Mumbai

ड्रीम इलेव्हन आयपीएलमध्ये आज सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे.

- Advertisement -

हा सामना जिंकून स्पर्धेतील आपला पाचवा विजय संपादन करण्यासाठी दोन्ही संघांनी कंबर कसली आहे. कोलकाता ६ सामन्यांमध्ये ४ विजय आणि २ पराभवांसह तिसऱ्या तर बंगळूर ४ विजय आणि २ पराभवांसह चौथ्या स्थानावर आहे.

दोन्ही संघांनी आपला शेवटचा सामना जिंकला असल्यामुळे दोन्ही संघांचे हौसले बुलंदीवर आहेत. त्यामुळे आज नेमका कोणता संघ बाजी मारतो ? ते पाहणे उत्सुकतेचे ठरणारं आहे.

दोन्ही संघांमध्ये अनेक म्याचविनर खेळाडू असल्यामुळे एक रोमांचक सामना पाहायला मिळण्याची प्रेक्षकांना संधी मिळणार आहे. बंगळूर आणि कोलकाता यांच्यात आतापर्यंत एकूण २५ सामने झाले असून यात कोलकाताने १४ तर बंगळूरने ११ लढती जिंकल्या आहेत.

पण या सामन्यापूर्वी कोलकाता संघाला एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्फोटक अष्टपैलू आंद्रे रसेल याला शनिवारी पंजाबविरुद्ध सामन्यात दुखापत झाली होती. अद्याप ही दुखापत किती गंभीर आहे हे समजू शकलेले नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात रसेलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शिवाय संघाचा स्टार गोलंदाज सुनील नारायण गोलंदाजीची शैली संशयाच्या भोवऱ्यात सापडली असल्याने कदाचित तो खेळू शकणार नाही. पंजाबविरुद्ध सामन्यात त्याच्या गोलंदाजीवर आक्षेप घेण्यात आला होता.

कोलकाता संघासाठी जमेची बाजू म्हणजे सलामीवीर शुभमन गील , नितीश राणा, इऑन मॉर्गन फॉर्मात आहेत. शिवाय आनंदाची गोष्ट म्हणजे कर्णधार दिनेश कार्तिकलाही फॉर्म गवसला आहे. त्यांना आपल्या कामगिरीत सातत्य राखणे गरचेचे आहे.

– सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या