Thursday, March 27, 2025
Homeधुळेमेंढपाळावर चाकू हल्ला ; पाच जणांवर गुन्हा दाखल

मेंढपाळावर चाकू हल्ला ; पाच जणांवर गुन्हा दाखल

दोंडाईचा । श. प्र

शिंदखेडा तालुक्यातील अंजनविहरे येथे मेंढपाळास हाताबुक्क्यांनी मारहाण करून चाकू हल्ला केला. त्याला उजव्या बोटाला दुखापत करत जखमी केले. अंजनविहरे येथील पाच संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

शिंदखेडा तालुक्यातील अंजनविहरे शिवारात बारकू आना ठेलारी (वय 35) यांच्या घराला आजूबाजूला लावलेले काटे काढून त्यातील सामान घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथील संतोष हाटकर, अनिल संतोष हाटकर, शिवाजी संतोष हाटकर, लिलाबाई संतोष हाटकर, शिवाजी यांची पत्नी सर्व रा.अंजनविहरे ता.शिंदखेडा अशांनी बारकू ठेलारी यांना मारहाण केली. वरील पाच जणांनी एकत्रितपणे येऊन अंगावर धावून हल्ला केला. त्यांना हाताबुक्क्यांनी व लाथांनी मारहाण करून शिवीगाळ करत दमदाटी केली. अनिल संतोष हटकर याने धमकी देऊन त्याच्या खिशातील चाकूने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या उजवा हातावर वार केला. वार चुकून तो वार उजव्या आताचे मधल्या बोटावर बसला यात ते दुखापती होऊन जखमी झाले. शिवीगाळ, दमदाटी करून खाली जमिनीवर पडून हाताच्या पंजावर त्याने आणलेल्या मोटरसायकलचे पुढील चाक चालून घेऊन गेला. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गायकवाड हे करीत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : “… तर आदित्य ठाकरेंना अटकही होऊ शकते”; शिंदेंच्या...

0
मुंबई | Mumbai यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) दिशा सालियन मृत्यू (Disha Salian Murder Case) प्रकरण चांगलेच गाजले. आधी दिशाने आत्महत्या केल्याचा दावा करण्यात...