दोंडाईचा – श. प्र. dondaicha
येथे पारिवारिक वादातून शालकानेच मेहुण्यावर चालू हल्ला (attack) केला. त्यात मेहुणा गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात (Hospital) उपचार घेत आहे. शालकासह 10 ते 15 जणांवर दोंडाईचा पोलिसात (police) गुन्हा दाखल झाला आहे.
सुरक्षा रक्षक तौसिफ लियाकत सैय्यद, (वय 31रा. रजा कॉलनी दोंडाईचा ह.मु कल्याण) यांच्या फिर्यादीनुसार, तो दि.12 रोजी दुपारी वडीलासह दोंडाईचा येथील इस्लामपुरा येथे राहणारे सासरे यांचे कडेस पत्नीला आणण्यास गेले होते. तेव्हा शालक शोएब जाकिर सैय्यद याने शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादीसह दोन्ही रजा कलनी येथे जात असतांना शालकाने जिवे मारण्याची धमकी दिली.
शालक शोएब जाकिर सैय्यद याने त्याचा मित्र सोनु शेख व त्याचे सोबत 10 ते 15 जणांनी संगनमत करून घराचे अंगणात येवुन शिवीगाळ करीत घरावर दगड फेक सुरु केली. तेव्हा फिर्यादी यांनी घरा बाहेर आले असता सोनु शेख याने त्याचे दोन्ही हात मागे धरून ठेवले.
तर शालक शोएब जाकिर सैय्यद याने त्यांचे खिशातुन चाकु काढून डाव्या साईडला बरगडीचे खाली खुपसुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यात फिर्यादी हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. त्यानुसार दोंडाईचा पोलीस ठाण्यात शोएब जाकीर सय्यद मित्र सोनू शेख व त्यांचे 10 ते 15 मित्र यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी (Police Inspector Durgesh Tiwari) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष लोले तपास करत आहेत.