मुंबई | Mumbai
आयपीएलच्या १६ (IPL 16) व्या हंगामातील साखळी फेरीचे सामने संपले असून ७० सामन्यांनंतर प्लेऑफचे (Playoffs) चार संघ निश्चित झाले आहेत. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. या पराभवानंतर आरसीबीचा (RCB) संघ स्पर्धेतून बाहेर झाला असून मुंबई इंडियन्सने आरसीबीच्या पराभवाचा फायदा घेत अंतिम ४ मध्ये आपले स्थान निश्चित केले. त्यानंतर आता प्लेऑफचे सामने सुरू होणार आहेत…
Monsoon Updates : राज्यात मान्सून कधी दाखल होणार? हवामान अभ्यासकांनी वर्तवला अंदाज
प्लेऑफचा पहिला सामना (क्वालिफायर-१) २३ मे रोजी गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (Gujarat Titans and Chennai Super Kings) या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. यानंतर चेन्नईतच मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स (Mumbai Indians and Lucknow Supergiants) यांच्यात एलिमिनेटर सामना होणार आहे.
Accident News : पंढरपूरहून परणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; ३ ठार, ७ जण गंभीर जखमी
त्यानंतर क्वालिफायर-२ हा क्वालिफायर-१ मध्ये पराभूत झालेला संघ आणि एलिमिनेटर सामना जिंकणारा संघ यांच्यात खेळविला जाईल. या सामन्यातील विजयी संघ क्वालिफायर-१ च्या विजेत्याशी अंतिम सामना २८ मे रोजी खेळेल. तर क्वालिफायर २ आणि आयपीएल २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) रंगणार असून हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहेत.
Boat Accident : गंगा नदीत ४० जणांनी भरलेली बोट उलटली; चौघांना जलसमाधी, अनेक जण बेपत्ता
गुजरातचा विजय अन् मुंबईची चांदी
रविवारी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने २० षटकात ५ विकेट्स गमावत १९७ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने १९.१ षटकांत चार गडी गमावून १९८ धावा केल्या. या सामन्यात दोन शतके पाहायला मिळाली. आरसीबीकडून अनुभवी विराट कोहलीने नाबाद १०१ धावांची खेळी केली. त्यानंतर भारताचा युवा स्टार शुबमन गिलने नाबाद १०४ धावा केल्या. गुजरातने आरसीबीवर मिळविलेल्या विजयामुळे आरसीबीचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतुन बाहेर झाला. तर मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे आता मुंबई आणि लखनऊचा संघ एलिमिनेटरच्या सामन्यात आमने सामने येणार आहेत.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
प्ले ऑफ वेळापत्रक (तारीख, सामना, संघ ठिकाण वेळ)
२३ मे क्वालिफायर-१ गुजरात विरुद्ध चेन्नई चेन्नई संध्याकाळी ७.३० वा
२४ मे एलिमिनेटर लखनऊ विरुद्ध मुंबई चेन्नई संध्याकाळी ७.३० वा
२६ मे क्वालिफायर-२ – अहमदाबाद संध्याकाळी ७.३० वा
२८ मे फायनल – अहमदाबाद संध्याकाळी ७.३० वा