Saturday, May 4, 2024
Homeनगरकोळ नदीवरील बंधारे पालखेडच्या पाण्याने भरले - बबनराव निकम

कोळ नदीवरील बंधारे पालखेडच्या पाण्याने भरले – बबनराव निकम

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

पूर्व भागातील आपेगाव, शिरसगाव, सावळगाव, उक्कडगू, तिळवणी, कासली, पढेगाव आदह परिसरातील कोळनदीवरील बंधारे पालखेड डाव्या कालव्याच्या ओव्हरफ्लोच्या पाण्याने भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता, बिपीन कोल्हे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे भरले असल्याची माहिती केशवराव भवर व पंचायत समितीचे माजी सदस्य बबनराव निकम यांनी दिली.

- Advertisement -

संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी पूर्व भागावर सातत्याने विशेष लक्ष केंद्रीत करून येथील प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी काळजी घेतली होती. त्यानंतर भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी 2014 पासून पूर्व भागातील प्रत्येक प्रश्न समजून घेऊन त्यावर मार्ग काढला आहे.

चालु पावसाळी हंगामात पर्जन्यमान कमी असल्याने पूर्व भागातील आपेगाव, शिरसगाव, सावळगाव, उक्कडगाव, तिळवणी, पढेगाव, कासली आदी परिसरात कोळनदीवर संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी कारखान्याच्या यंत्रणेने भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी यासाठी बंधारे, पाझर तलाव, शेततळी केली असून पालखेड कालव्याच्या पाण्याने हे सर्व बंधारे भरून मिळावेत म्हणून सौ. स्नेहलता कोल्हे यांनी उत्तर महाराष्ट्र जलसंपदा विभाग नाशिकचे मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे यांच्याकडे बैठक घेऊन मागणी केली होती.

पालखेडचे कार्यकारी अभियंता व येवला उपविभाग कार्यालयातील उपअभियंता श्री. पाटील यांच्याकडे याकामी विशेष पाठपुरावा केला होता त्यामुळे कोळनदीवरील सर्व बंधारे पालखेड ओव्हरफ्लोच्या पाण्याने भरून मिळाल्याने या परिसरातील नागरिक व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे. याकामी सर्वश्री साहेबराव रोहोम, अंबादास पाटोळे, अशोक निवृत्ती शिंदे, मनोज तुपे, अशोक भानुदास शिंदे, सुरेश शिंदे, किसनराव गव्हाळे, शिवाजी जाधव, अशोक गायकवाड, केशव गायकवाड, संतोष भागवत, हेमंत निकम, श्री. पटेल, भिमा संवत्सरकर, कैलास संवत्सरकर आदींनी ग्रामपंचायत ठराव दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या