Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजPrashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक

मुंबई | Mumbai

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा तसेच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) तेलंगणातून अटक (Arrested) केल्याची माहिती समोर आली आहे. कोरटकर हा २५ फेब्रुवारीपासून फरार होता. त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर पोलिसांकडून (Police) त्याचा शोध सुरु होता. अखेर पोलिसांना त्याचा सुगावा लागला आहे.

- Advertisement -

प्रशांत कोरटकर सुरुवातीला नागपुरातून (Nagpur) फरार होऊन चंद्रपूरमध्ये लपून बसला होता. त्यानंतर कोल्हापूर पोलिस त्याला अटक करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणाहूनही तो फरार झाला होता. त्यानंतर प्रशांत कोरटकरला आता एका महिन्यानंतर तेलंगणामधून (Telangana) अटक केल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, त्या ठिकाणी नोंद केल्यानंतर कोल्हापूर पोलिस त्याला ताब्यात घेतील. यानंतर त्याला महाराष्ट्रात (Maharashtra) आणले जाईल. इंद्रजीत सावंत यांनी कोरटकर विरोधात कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे कोरटकरला आता कोल्हापूरला आणण्यात येणार असल्याचे समजते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...