Monday, April 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात बोलेरोचा चक्काचूर; एकाच गावातील ३ युवकांचा मृत्यू

ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात बोलेरोचा चक्काचूर; एकाच गावातील ३ युवकांचा मृत्यू

कोल्हापूर | Kolhapur
देवगड-निपाणी राज्य महामार्गावर बोलेरोची ट्रकला धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच गावातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. ऐन गणेशोत्सवात सोळंकूर गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ११ सप्टेंबर २०२४ रोजी मध्यरात्री १२:३० वाजता सरवडे येथील नदीच्या पुलाजवळ वळणावर ट्रक ने बोलेरोला समोरून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बोलेरोचा चक्काचूर झाला आहे. भीषण अपघातात सोळांकुर गावातील शुभम चंद्रकांत धावरे (२८), आकाश आनंदा परीट (२३) आणि रोहन संभाजी लोहार (२४) या तीन युवकांचा मृत्यू झाला. तर ऋत्विक राजेंद्र पाटील, भरत धनाजी पाटील, सौरभ सुरेश तेली आणि संभाजी लोहार हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

दरम्यान, या अपघातानंतर फिर्यादी राजेंद्र मनोहर लोहार (वय ४१, रा. सोळांकुर) यांनी अज्ञात ट्रक चालकाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. अपघाताची राधानगरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. अज्ञात ट्रक चालकाने बेदरकारपणे वाहन चालवून अपघात केल्यानंतर कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सोळंकूर गावातले ६ जण कामासाठी गारगोटीला गेले होते. काम आटोपून ते रात्री उशीरा घरी येताना मुदाळ तिठ्ठ्यावर संभाजी लोहार हे त्यांच्या गाडीत बसले. तिथून पुढे आल्यावर रस्त्यातच हा भीषण अपघात झाला. अपघातानंतरचे दृश्य अंगावर काटा आणणारे होते. अपघाता बोलेरो चालक शुभम धावरे याचे शीर धडावेगळे झाले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

सुप्रीम

Supreme Court: सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकार आणि ओटीटी प्लॅटफॉर्मना नोटीस; अश्लील...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावरील अश्लीलतेबाबत असणाऱ्या चिंतेशी सुप्रीम कोर्टाने सहमती दर्शवली आहे. तसेच ही अश्लीलता दूर करण्यासाठी केंद्राने...