Sunday, November 24, 2024
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray: खोके सरकारला भस्म करण्याचा क्षण आला…; कोल्हापूरमधून उध्दव ठाकरेंचा महायुती...

Uddhav Thackeray: खोके सरकारला भस्म करण्याचा क्षण आला…; कोल्हापूरमधून उध्दव ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा

कोल्हापूर | Kolhapur
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार के.पी. पाटील उमेदवारी करत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आज आदमापुर येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी थेट महायुती सरकारवर हल्लाबोल केला. कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेतलं. बाळू मामांचे आशीर्वाद घेतले. आता तुमचं दर्शन घेऊन पुढे जाणार आहे. तुमचा उत्साह पाहिल्यानंतर हा राधानगरी मतदारसंघ गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही यात शंका नाही, असे उद्धव ठाकरे म्हणालेत.

काय म्हणाले उध्दव ठाकरे?
‘खोके सरकारला भस्म करण्याचा क्षण आता आला आहे.’, असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. यासोबत लाडकी बहीण योजना, महागाई, भाजप आणि महायुतीवर उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाषण करताना सांगितले की, ‘तुमच्या मनात एक राग आहे. हा राग गेली अडीच वर्षे आपल्या मनात धगधगत ठेवला होता. खोके सरकारला भस्म करण्याचा क्षण आता आला आहे. कोल्हापूरच्या विजयाची जबाबदारी आता सतेज पाटील यांच्याकडे देतो. मी माझ्यासाठी लढत नाही तर महाराष्ट्रासाठी लढतोय. मी त्यांच्याबरोबर जाऊ शकलो असतो. त्यांना ५० खोके दिले. मी जर अख्खी शिवसेना घेऊन गेलो असतो तर गोदाम कमी पडले असते. पण गद्दारी माझ्या रक्तात नाही.’

- Advertisement -

हे ही वाचा: Sharad Pawar : शरद पवारांचे अजित पवारांबाबत मोठे वक्तव्य; माझ्या मनात त्यांच्याबद्दल त्या संदर्भात कुठली ही…

मोदी-शहांवर निशाणा
निवडणुकीत हिंदू मुस्लिम करायचे तोडफोड करायची. मराठी माणसात फूट पाडायची,. तुम्ही मेला तरी चालेल, तुम्हाला सत्ता मिळाली पाहिजे ही भाजपची नीती आहे. गेल्यावेळी निवडून दिले, तू तिकडे गेला. लाचार झाला. पण आता राधानगरीकर लाचार होणार नाही. महाराष्ट्र विकणाऱ्यांना मदत करेल तो महाराष्ट्राचा शत्रू. जो अदानी, शहांना मदत करतो तो महाराष्ट्राचा शत्रू. जो मोदी आणि शाह यांची पालखी वाहतो तो महाराष्ट्राचा विरोधक, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सतेज पाटलांवर के.पी. पाटलांच्या विजयाची जबाबदारी सोपवतो
या सभेत काँग्रेस नेते सतेज पाटील उपस्थित होते. काल कोल्हापूरमध्ये घडलेल्या प्रकारानंतर उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच सतेज पाटील यांनी आपल्या जवळ बोलावले. सतेज पाटील उद्धव ठाकरेंच्या जवळ जाताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटील यांच्यावर राधानगरी विधानसभा मतदारसंघातून के पी पाटील यांच्या विजयाची जबाबदारी देखील सोपवली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आताची लढाई महाराष्ट्र प्रेमी विरुद्ध महाराष्ट्र द्रोही अशी आहे. आज मी साथ मागायला आलो आहे. तुम्ही माझ्यासोबत लढायला तयार आहात का? प्रचाराचा नारळ आई अंबाबाईचे दर्शन घेऊन करतो. बाळूमामा यांचं दर्शन घेऊन तुमचे दर्शन घेतोय. राधानगरीची जनता गद्दाराला गाडल्याशिवाय राहणार नाही. मी उमेदवारी दिली, मान सन्मान दिला, प्रेम दिले. सगळे देऊन शिवसेनेसारख्या आईवर वार कसा काय करू शकतो? सतेज पाटील सोबत आहेत हे मला आणखी बरे वाटले. इथल्या विजयाची जबाबदारी सतेज पाटील यांच्यावर टाकतो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

हे ही वाचा:Satej Patil Kolhapaur: शप्पत सांगतो की, जे काही का घडले, त्याची मला अजिबात कल्पना नव्हती, म्हणत सतेज पाटलांना रडू कोसळले…

मुलींसोबत मुलांनाही मोफत शिक्षण देणार
आज राज्यात सरकारी शाळांमध्ये मुलींना शिक्षण मोफत आहे. आता आम्ही मुलांनाही तेवढेच मोफत शिक्षण देणार. कारण, हे दोघेही आपले आधारस्तंभ आहेत. दोन्ही भवितव्य आहेत. मुलगी आणि मुलगा माझ्या महाराष्ट्राचे आधारस्तंभ आहे. महाराष्ट्र सरकार मुलींना मोफत उच्च शिक्षण देत आहे, मग मुलांनी काय गुन्हा केला आहे? आम्हा मुलांनाही मोफत शिक्षण देणार, असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र अदानीच्या घशात घालण्यासाठी यांना सरकार पाहिजे. तुम्हाला मोदी-शाह यांचा महाराष्ट्र तुम्हाला मान्य आहे का? की छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र पाहिजे. तीन-तीन भाऊ आले आहेत. एका बाजूला देवा भाऊ दुसरीकडे दाढी भाऊ, तिसरीकडे जॅकेट भाऊ. भाऊ-भाऊ आणि मिळून खाऊ, अशी टीका त्यांनी महायुतीवर केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या