Sunday, November 24, 2024
Homeनगरकोल्हार भगवतीपूरमध्ये वादळी पावसाने घराचे पत्रे उडाले; झाडे उन्मळून पडली

कोल्हार भगवतीपूरमध्ये वादळी पावसाने घराचे पत्रे उडाले; झाडे उन्मळून पडली

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

अवघ्या वीस मिनिटांसाठी कोल्हार भगवतीपूर (Kolhar Bhagawatipur) परिसरात सोसाट्याच्या वार्‍यासह पावसाने (Rain) हजेरी लावली मात्र दाणादाण उडवून दिली. काही ठिकाणी घराचे पत्रे 100 फुटापर्यंत लांब उडाले. अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून रस्त्यावर कोसळली. त्यामुळे वाहतूक खोळंबली. परिसरात ठीक ठिकाणी विजेचे खांब खाली पडले. विद्युतवाहक तारा तुटल्या. रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा खंडित (Power Supply Interrupted) होता.

- Advertisement -

सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस (Rain) बरसला. अवघ्या वीस मिनिटं वादळी वार्‍यासह पावसाने सलामी दिली. मात्र या अल्पावधीत ठिकठिकाणी मोठ्या नुकसानींना सामोरे जावे लागले. कोल्हार बुद्रुक येथे तिसगाव वाडी रस्त्यालगत हरिभाऊ वामन डौले यांच्या घराचे पत्रे उडून शंभर फूट लांबपर्यंत जाऊन पडले. यावरून वादळी वार्‍याचा वेग किती प्रचंड होता याची कल्पना येते. घराच्या पत्र्यासोबतच घरातील टेबल फॅन व इतर साहित्यदेखील वार्‍यामध्ये उडून लांब जाऊन पडले. तसेच कोल्हार-लोणी रोडवर (Kolhar Loni Road) काळामळा, पाच मोर्‍या, प्रवरानगर फाट्याजवळ ठीकठिकाणी अनेक मोठमोठ्या झाडांची पडझड झाली. त्यामुळे बराच काळ या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. जेसीबीच्या साह्याने रस्त्यावरील झाडे बाजूला करण्यात आली.

तब्बल दीड तासानंतर वाहतूक सुरळीत झाली. त्याचप्रमाणे भगवतीपूर शिवारात कोल्हार -सोनगाव रोडवर पोहीजवळ झाडे उन्मळून रस्त्यावर पडली. कोल्हार बुद्रुक येथील बनकर फाटा येथे विजेचा खांब पडल्याने त्या भागातील 17 रोहित्र बंद पडले. नवाळे वस्तीवर 4 विजेचे खांब खाली कोसळले. गावामध्ये 2 ठिकाणी विजेच्या खांबावर झाड पडल्याने लोखंडी खांब वाकले व विद्युत वाहक तारा तुटल्या. तिसगाववाडी येथे विजेचा लोखंडी खांब वाकला. बर्‍याच ठिकाणी विद्युत वाहक तारा तुटल्या. पावसाला सुरुवात झाल्यानंतर दुपारी साडेचार वाजल्यापासून कोल्हार भगवतीपूरमधील विद्युत पुरवठा खंडित झाला. दुपारी साडेचार वाजता खंडित झालेला वीजपुरवठा उशिरा साडेआठ वाजेपर्यंत सुरळीत झालेला नव्हता.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या