Monday, May 5, 2025
Homeनगरअज्ञात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

अज्ञात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील चांदवड (Chandwad) तालुक्यातून मढीला कानिफनाथ महाराज दर्शनासाठी चाललेल्या दोघा मित्रांच्या दुचाकीला (Bike) कोल्हारच्या पुलावर अज्ञात ट्रकने धडक (Accident) दिली. ट्रकच्या (Truck) टायरखाली चिरडल्याने एक जण जागीच ठार (Death) तर सोबतचा व्यक्ती जबर जखमी झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

मयताचे नाव शरद सोनू गांगुर्डे (वय 55 रा. सुतारखेडे, ता. चांदवड, जि. नाशिक) असे आहे. त्यांच्यासोबत मित्र एकनाथ पुंजाराम गांगुर्डे (वय 60 रा. सुतारखेडे, ता. चांदवड) हे दोघे जण स्प्लेन्डर दुचाकी (एमएच15 एचडब्ल्यू 818) वरुन मढीला (Madhi) चालले होते. रविवारी दीप अमावस्या असल्याने चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी ते दोघे पहाटे 5 वाजता आपापल्या घरुन निघाले होते. मात्र अर्ध्या वाटेवरच काळाने एकावर झडप घातली.

कोल्हारच्या (Kolhar) पुलावर महादेव मंदिराजवळ असतानाच एक अज्ञात ट्रकने यांच्या दुचाकीला सकाळी साडेसात वाजता जोराची धडक (Hit) दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ट्रक राजस्थान पासिंगचा होता. मात्र ट्रकचा पूर्ण क्रमांक दिसण्याअगोदरच धडक देऊन ट्रक तसाच पुढे वेगाने पसार झाला. शरद गांगुर्डे हे ट्रकच्या टायरखाली चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू (Death) झाला. त्यांच्यासोबत असलेले एकनाथ गांगुर्डे यांच्या पायावरून ट्रकचे टायर गेल्याने ते जबर जखमी झाले. विखे कारखान्याच्या रुग्णवाहिकेतून त्यांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात (Pravara Rural Hospital) दाखल करण्यात आले. कोल्हारच्या पुलाजवळ अपघातांचे (Accident) प्रमाण वाढले आहे. गेल्या तीन दिवसात कोल्हार बुद्रुक आणि कोल्हार खुर्द येथे पुलानजीक तीन अपघात (Accident) झाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : ५ मे २०२५ – पर्यटनपूरक पाऊल

0
दिवस उन्हाळी पर्यटनाचे आहेत. तसेही अलीकडच्या काळात पर्यटनाला चांगले दिवस आले आहेत. परिणामी तिन्ही ऋतूत कुठल्या ना कुठल्या ठिकाणी पर्यटनप्रेमींचे पर्यटन सुरूच असते. ते...