Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमकोल्हारमध्ये दोन गटांत लाकडी दांडक्याने हाणामारी

कोल्हारमध्ये दोन गटांत लाकडी दांडक्याने हाणामारी

15 जणांविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

कोल्हार बुद्रुक येथे रविवारी रात्रीच्या सुमारास दोन गटात लाकडी दांडक्याच्या साह्याने तुफान हाणामारी झाली. दोन्ही गटांनी परस्परांविरुद्ध फिर्यादी दिल्या असून त्यावरून एकूण 15 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. स्वप्निल धनंजय लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, कोल्हार बुद्रुक येथील आंबेडकरनगर हाऊसिंग सोसायटीजवळ दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून मी, माझे चुलत भाऊ, चुलते, वडील यांच्यासह जाब विचारण्यासाठी गेले असता प्रसन्ना लोखंडे यांनी तुम्ही खूप माजले आहेत असे म्हणून लाकडी दांडक्याने मारहाण केली. तुम्हाला काय करायचे ते करून घ्या असे म्हणून धमकी दिली.

- Advertisement -

जेव्हा मी माझे चुलत भाऊ, चुलते, वडील यांच्यासह कोल्हार पोलीस चौकी येथे तक्रार करण्यासाठी जात असताना प्रसन्ना उर्फ लवलेश विलास लोखंडे, योगेश एकनाथ लोखंडे, विजय बाबासाहेब मिजगुले, राहुल बोकंद, शुभम राशिनकर, पंकज उर्फ यश भोसले, सनी काळे, आशिष अनिल सांगळे, अजय भोसले सर्व राहणार कोल्हार बुद्रुक यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. यावरून लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 425/2024 भारतीय न्याय संहिता कलम 118 (1), 115 (2), 351 (2), 352, 189 (2), 191 (2), 191 (3) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याविरुद्ध प्रसन्ना विलास लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, मी, योगेश एकनाथ लोखंडे यांना सोबत घेऊन शेतात पिकांना पाणी देण्यास मोटार चालू करण्यासाठी बस स्थानकासमोरून जात असताना धनंजय शाहूराव लोखंडे, अनुप शाहूराव लोखंडे, बंटी अनुप लोखंडे, स्वप्निल धनंजय लोखंडे, रवी धनंजय लोखंडे, बल्ल्या अनुप लोखंडे सर्व राहणार हाऊसिंग सोसायटी, कोल्हार बुद्रुक हे दुचाकीला आडवे होऊन तुम्ही लई खुन्नसने आमच्याकडे पाहता. तुम्ही लई पैशावाले झाले काय? लई माजलेत असे म्हणून लाकडी दांड्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. यावरून लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 426/2024 भारतीय न्याय संहिता कलम 118 (1), 115 (2), 352, 126 (2), 189 (2), 191 (2) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...