Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाIPL 2022 : कोलकाता-राजस्थान आज भिडणार

IPL 2022 : कोलकाता-राजस्थान आज भिडणार

मुंबई | Mumbai

आयपीएलमध्ये (IPL) आज कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचा सामना सायंकाळी ७:३० वाजता राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाशी होणार आहे. दोन्ही संघ आजच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतील यात काही शंका नाही. दोन्ही संघांनी आतापर्यंत ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. आजच्या सामन्यात विजय संपादन करून विजयी चौकार मारण्याच्या इराद्याने दोन्ही संघ आज मैदानात उतरणार आहेत….

- Advertisement -

दोन्ही संघांना आजच्या सामन्यात विजय अनिवार्य असणार आहे. कोलकाता (KKR) आणि राजस्थान (RR) दोन्ही संघांचे ६ गुण आहेत. मात्र सरस धावगतीमुळे राजस्थान पाचव्या आणि कोलकाता सहाव्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून अव्वल ४ संघांमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी राजस्थान आणि कोलकाता एकमेकांचा सामना करतील.

यंदाच्या हंगामात दोन्ही संघाच्या कामगिरीवर नजर टाकल्यास राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाची कामगिरी कोलकाता संघाच्या तुलनेत अधिक सरस आहे राजस्थान संघाने ५ सामन्यांमध्ये ३ विजय आणि २ पराभवांसह ६ गुणांची कमाई केली आहे. कोलकाता संघाच्या खात्यातही ६ गुण आहेत.

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आतापर्यंत एकूण २५ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. यात कोलकाताने १३ तर राजस्थान रॉयल्स संघाने ११ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. गत ५ सामन्यांमध्ये कोलकाता संघाने ३ तर राजस्थान रॉयल्स संघाने २ विजय नोंदवले आहेत.

कोलकाता संघासाठी एक महत्वाची समस्या म्हणजे मागील ३ सामन्यांमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये संघाने केलेली सुमार कामगिरी होय. कोलकाता आणि राजस्थान रॉयल्स संघाची तुलना केल्यास राजस्थान रॉयल्स अधिक संतुलित दिसत आहे.

संघासाठी जमेची बाजू म्हणजे सलामीवीर यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर आणि शिमरॉन हेटमायर चांगली कामगिरी करत आहेत. मात्र संघासाठी चिंतेची बाब म्हणजे देवदत्त पडिकल, कर्णधार संजू सॅमसन यांच्याकडून कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला आहे. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, आर अश्विन, युझवेन्द्र चहल सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे.

कोलकाता संघाच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला आहे. सलामीवीर व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, एरन फिंच संघाला चांगली सुरुवात करून देण्यात अपयशी ठरले आहेत. त्यांच्याकडून आज मोठी खेळी संघ व्यवस्थापनाला अपेक्षित असणार आहे. याशिवाय कर्णधार श्रेयस अय्यर, नितीश राणा, आंद्रे रसेल चांगल्या लयीत आहेत. त्यांना इतर फलंदाजांची साथ मिळणे गरजेचे आहे. याशिवाय फिरकीपटू वरुण चक्रवर्ती वगळता कोलकाताच्या सर्वच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. आजच्या सामन्यातील जोस बटलर, संजू सॅमसन, आर अश्विन, श्रेयस अय्यर, सुनील नारायण हे स्टार प्लेअर्स असतील.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या