Thursday, November 12, 2026
Homeदेश विदेशकोलकाता-मुंबई विमानात अपहरणाची धमकी; उड्डाणापूर्वी चिठ्ठी सापडताच सुरक्षा यंत्रणा सतर्क

कोलकाता-मुंबई विमानात अपहरणाची धमकी; उड्डाणापूर्वी चिठ्ठी सापडताच सुरक्षा यंत्रणा सतर्क

नवी दिल्ली | New Delhi
कोलकात्याहून मुंबईकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात अपहरणाची धमकी देणारा संदेश आढळल्याने विमानतळावर सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली. विमानाच्या स्वच्छतागृहातील आरशावर धमकीचा संदेश लिहिलेला असल्याचे समोर आले. खबरदारी म्हणून सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले असून विमान आयसोलेशन बे येथे नेऊन त्याची कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली. एअर इंडियाची फ्लाईट AI2772 (एअरबस A320, नोंदणी क्रमांक VT-TNH) या विमानाला सकाळी १०:२० वाजता मुंबईसाठी रवाना होणे अपेक्षित होते. विमान उड्डाणासाठी सर्व तयारी पूर्ण करून होल्डिंग पॉवरवर गेले होते. याच दरम्यान क्रू मेंबर्सना टॉयलेटमध्ये हायजॅकची धमकी असलेला संदेश मिळाला.

- Advertisement -

या संदेशात विमानाचे सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी अपहरण केले जाईल, असा इशारा देण्यात आल्याचे कोलकाता विमानतळाचे संचालक विक्रम सिंह यांनी सांगितले. संदेश निदर्शनास आल्यानंतर विमानतळ प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांना तातडीने सतर्क करण्यात आले.

प्रवाशांना उतरवून विमान आयसोलेशन बेमध्ये
धमकीची माहिती मिळताच सुरक्षेच्या नियमानुसार विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. त्यानंतर विमान मुख्य धावपट्टीपासून दूर असलेल्या आयसोलेशन बे येथे हलवण्यात आले. विमानाची सखोल तपासणी करण्यासाठी सुरक्षा पथके तैनात करण्यात आली.

विमानातील प्रत्येक भागाची तपासणी करण्यात येत असून कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा घातपाताची शक्यता आहे का, याची पडताळणी केली जात आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आणि विमानतळावरील विशेष सुरक्षा पथकांनीही तपासणी केली.

An Air India flight scheduled to operate from Kolkata to Mumbai was moved to the isolation bay this morning following a threat alert shortly before take-off. Security agencies immediately reached the spot and initiated checks as per standard operating procedures (SOP). The situation is being assessed, and further details are awaited.— ANI (@ANI) November 11, 2026

विमानात एकूण १०८ प्रवासी आणि क्रू मेंबर होते उपस्थित!
ज्या विमानामध्ये ही धमकीची चिठ्ठी आढळली, त्या एअरबस ए३२० विमानात एकूण १०८ लोक प्रवास करत होते. यामध्ये ९३ प्रवासी, ५ क्रू मेंबर्स आणि १० इतर कर्मचारी यांचा समावेश होता. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

धमकी कोणी दिली? तपास सुरू
विमानाच्या स्वच्छतागृहातील आरशावर धमकीचा संदेश कोणी लिहिला, तो संदेश कधी लिहिण्यात आला आणि त्यामागे कोणाचा हेतू होता, याचा तपास सुरू आहे. विमानतळ परिसरातील तसेच उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असून प्रवाशांची आणि विमानातील कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या