Friday, September 11, 2026
HomeनगरAccident News : वाहनातून खाली पडलेल्या चालकाचा त्याच वाहनाच्या चाकाखाली मृत्यू

Accident News : वाहनातून खाली पडलेल्या चालकाचा त्याच वाहनाच्या चाकाखाली मृत्यू

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील येवला नाका परिसरात कंटेनर वाहनाची दुरुस्ती झाल्यानंतर चाचणी घेत असताना वाहनावरील ताबा सुटून वाहनातून खाली पडलेल्या चालकाचा त्याच वाहनाच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवार २ जुलै रोजी रात्री १०:३० च्या सुमारास घडली.

- Advertisement -

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एक कंटेनर वाहन नादुरुस्त झाल्याने चालकाने ते दुरुस्तीसाठी येवला नाका येथील एका गॅरेजजवळ उभे केले होते. दुरुस्ती झाल्यानंतर वाहनाची चाचणी सुरू असताना चालकाच्या बाजूचा दरवाजा पूर्णपणे बंद नव्हता. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चालक दरवाजातून खाली पडला आणि स्वतःच कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर सदर कंटेनर येवला नाका येथील साई टुरिस्ट हॉटेलसमोरील भिंतीला जावून धडकला.

अपघातामुळे नगर- मनमाड महामार्गावर कंटेनर आडवा झाल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव नगरपालिकेची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. मयत चालकाचा मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, वाहतूक पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणा आणि पोलिसांकडून प्रयत्न सुरू असून, या अपघाताचा अधिक तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दुष्काळाची चाहूल; ऑगस्टपाठोपाठ सप्टेंबरही कोरडा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्ह्यात ऑगस्टपाठोपाठ सप्टेंबर महिन्यातही पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिके होरपळून निघत असून राहुरी, श्रीरामपूर,...