Sunday, May 10, 2026
HomeनगरKopargaon : इलेक्ट्रिक मोटारीचा शॉक लागून महिलेचा मृत्यू

Kopargaon : इलेक्ट्रिक मोटारीचा शॉक लागून महिलेचा मृत्यू

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon

शहरातील लक्ष्मीनगर परिसरात एक दुर्दैवी घटना घडली असून घरी पाणी भरत असताना इलेक्ट्रिक मोटारीचा शॉक (Electric Motor Shock) लागून एका महिलेचा मृत्यू (Woman Death) झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत महिलेचे नाव ज्योती प्रकाश त्रिभुवन (वय 50, रा. लक्ष्मीनगर, कोपरगाव) असे आहे.

- Advertisement -

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवार 9 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घरातील इलेक्ट्रिक मोटार सुरू असताना अचानक त्याचा जोरदार शॉक (Electric Shock) लागल्याने ज्योती प्रकाश त्रिभुवन गंभीर जखमी झाल्या. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली आहेत.

या घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे (Kopargaon City Police Station) अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे. सदर घटनेमुळे लक्ष्मीनगर परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान नागरिकांनी घरगुती विद्युत उपकरणांचा वापर करताना आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : नाशिकमध्ये पुन्हा तिहेरी तलाक; पोटच्या गोळ्याचा मृत्यू...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik देशात 'तिहेरी तलाक ही प्रथा बेकायदेशीर आणि असंवैधानिक ठरवण्यात आली असताना नाशिक शहरात या अघोरी प्रथेचा जाच अद्यापही सुरू असल्याचे...