Saturday, April 4, 2026
HomeनगरKopargaon : कोपरगावात गॅस नळी फुटून भीषण अपघात

Kopargaon : कोपरगावात गॅस नळी फुटून भीषण अपघात

हलवाई वडेवाले दुकानातील तरुण गंभीर भाजला

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon

शहराचे हृदय समजल्या जाणार्‍या महात्मा गांधी चौकात शनिवारी दुपारी एका गजबजलेल्या खाद्यपदार्थाच्या दुकानात गॅस गळतीमुळे (Gas Leak Accident) अपघात झाला. वडे तळण्याचे काम सुरू असताना सिलिंडरची नळी फुटल्याने झालेल्या या घटनेत प्रथमेश नितीन हलवाई हा तरुण जखमी (Youth Injured) झाला असून या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण पसरले होते.

- Advertisement -

शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास महात्मा गांधी चौकातील प्रसिद्ध हलवाई वडेवाले या दुकानात नेहमीप्रमाणे ग्राहकांची वर्दळ होती आणि कढईत वडे तळण्याचे काम जोमाने सुरू होते. यावेळी शेगडीच्या उष्णतेमुळे सिलिंडरला (Cylinder) जोडलेली रबरी नळी प्रमाणाबाहेर गरम झाली आणि अचानक मोठा आवाज होऊन ती फुटली.

नळी फुटताच गॅसचा भडका उडाला. यावेळी जवळच काम करत असलेला प्रथमेश नितीन हलवाई हा तरुण आगीच्या विळख्यात आल्याने भाजला गेला. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक भयभीत झाले. सुदैवाने आग अधिक पसरली नाही आणि सिलिंडरचा स्फोट (Cylinder Explosion) झाला नाही, अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.

घटनेनंतर जखमी प्रथमेशला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात दुकानातील इतर साहित्याचे फारसे नुकसान झाले नसले तरी, गॅस उपकरणांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हॉटेल व्यावसायिकांनी वेळोवेळी गॅस नळी आणि रेग्युलेटरची तपासणी करणे आवश्यक असल्याचे या घटनेवरून अधोरेखित झाले आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ०४ एप्रिल २०२६ – बंगालमधील झुंडशाही

0
पश्चिम बंगालमधील कालीचक येथे घडलेली घटना लोकशाही व न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणारी आहे. तीन महिलांचा समावेश असलेल्या सात न्यायालयीन अधिकार्‍यांना तब्बल नऊ तास संतप्त...