कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargaon
तालुक्यातील दहेगाव बोलका (Dahegaon Bolaka) येथे गुरुवारी स्वयंपाकाच्या गॅस टाकीचा स्फोट (Gas Tank Explosion) होवून एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. सदर घटनेची बातमी समजताच आ. आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी आरोग्य विभागाला तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या.
दहेगाव बोलका (Dahegaon Bolaka) येथे गुरुवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास सुनील सोन्याबापू कर्पे यांची मुलगी भाग्यश्री ही गॅस स्वयंपाक करीत असतांना अचानकपणे गॅस टाकीचा स्फोट होवून यामध्ये सुनील कर्पे, त्यांची मुलगी भाग्यश्री व मुलगा ओंकार (वय 16) हे जखमी झाले. स्फोट झाल्यानंतर मोठा आवाज होवून घराच्या पत्र्यांचे देखील नुकसान झाले. सुनील कर्पे यांची पत्नीबाहेर कपडे धूत असल्यामुळे व त्याची आई देवदर्शनासाठी मंदिरात गेल्यामुळे सुदैवाने त्यांना काही झाले नाही. आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीश गुट्टे तसेच जिल्हा चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही माहिती देवून तातडीने उपचाराच्या सूचना दिल्या.
मात्र जखमी तिघांचीही प्रकृती काहीसी गंभीर असल्याने त्यांना प्रवरा ग्रामीण रुग्णालय (Pravara Rural Hospital), लोणी येथे दाखल करण्यात आले. आ.आशुतोष काळे यांनी प्रवरा ग्रामीण रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने उपचार सुरु करण्यास सांगितले असून त्यांच्यावर उपचार सुरु झाले आहे. मोलमजुरी करणार्या कर्पे कुटुंबातील तीन व्यक्ती अशा दुर्दैवी घटनेत जखमी झाल्यामुळे दहेगाव बोलका पंचक्रोशीतील हळहळ व्यक्त केली जात आहे.




