Friday, January 23, 2026
HomeनगरCrime News : पोलीस पाटलावर २० लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल

Crime News : पोलीस पाटलावर २० लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल

कोपरगाव, (तालुका प्रतिनिधी)

तालुक्यातील सोनेवाडी येथील पोलीस पाटील दगु मोहन गुडघे यांच्यावर जमिनीच्या खरेदी-विक्रीत तब्बल २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याबाबत रेशन दुकानदार किरण सीताराम डांगे (वय ४२, रा. जोशीनगर, कोपरगाव) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

- Advertisement -

फिर्यादीनुसार दगु मोहन गुडघे यांनी यापूर्वीच विकलेली ५० गुंठे जमीन पुन्हा विक्रीसाठी काढली. ही जमीन त्यांनी किरण डांगे यांना विकण्याचा व्यवहार केला. या व्यवहारापोटी गुडघे यांनी डांगे यांच्याकडून चेकने १५ लाख रुपये आणि रोख ५ लाख रुपये, अशी एकूण २० लाख रुपयांची रक्कम घेतली. मात्र, पैसे घेऊनही त्यांनी जमिनीचा ताबा दिला नाही.

YouTube video player

हा व्यवहार खोटा असल्याचा आरोप डांगे यांनी केला आहे. या प्रकरणी कोपरगाव हा व्यवहार खोटा असल्याचा आरोप शहर पोलिसांनी पोलीस पाटील दगु मोहन गुडघे यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ४२० (फसवणूक), ४६८ (बनावट कागदपत्रे तयार करणे), आणि ४७१ (बनावट कागदपत्रे वापरणे) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे करत आहेत. त्यांना पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

ताज्या बातम्या